देवराज मित्र मंडळाच्या वतीने देवानंद रोचकरी यांनी विधानसभा लढवावी जनतेतून मागणी
ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

देवराज मित्र मंडळाच्या वतीने देवानंद रोचकरी यांनी विधानसभा लढवावी जनतेतून मागणी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आगामी विधानसभा लढविण्यासाठी देवराज मित्र मंडळाचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे.आणि गेल्या पंचवीस वर्षापासून तालुक्यात मोठी पकडही आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात गावात देवराज मित्र मंडळाच्या शाखा स्थापन केलेल्या आहेत भूत कमिटी ही नेमलेली आहे. विधानसभेची तयारी केलेली आहे आम्हाला कोणत्याही पक्षांनी तिकीट दिले तर आम्ही सहज निवडून येऊ शकतो यात काही शंका नाही असे यावेळी पत्रकारांना बोलताना सांगितले.
आज पर्यंत देवराज मित्र मंडळाच्या वतीने तुळजापूर तालुक्यात विविध विधायक कार्यासाठी कामे करण्यात आलेले आहेत शेतकरी बांधव असो बेरोजगार तरुण असो महिलांचे प्रश्न असे विविध प्रश्नावर देवराज मित्र मंडळाच्या वतीने आवाज उठवण्याचे काम करण्यात आले असून यंदाच्या तुळजापूर विधानसभा मतदार संघातून देवानंद रोचकरी यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे .
देवराज मित्र मंडळ कडून निश्चित विधानसभा लढविणार यावेळी देवराज मित्र मंडळाचे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी देवराज मित्र मंडळाचे कृष्णा रोजकरी, ॲड उदय भोसले, गणेश रोचकरी, रसाळ असे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते