
बें
लोहारा प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील बेंडकाळ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यरत असलेले राजेंद्र शेषराव भोसले यांना पंचायत समिती गटशिक्षण कार्यालय तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दि.28/09/2024 रोजी धाराशिव जिल्ह्याचे खा ओम प्रकाश निंबाळकर व उमरगा लोहाराचे विधानसभा सदस्य ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सप्तरंग मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आला,
आदर्श शिक्षक असलेले राजेंद्र भोसले हे 2002 मध्ये सेवेमध्ये रुजू झाले असून 2017 पासून लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यरत आहेत,
राजेंद्र भोसले यांनी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर नेहमीच प्रयत्न केला आहे,
राजेंद्र भोसले यांना आदर्श पुरस्कार मिळाल्यामुळे बेंडकाळ ग्रामस्थ व जिल्हा परिषद शाळा बेंडकाळ व पालक यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष अमरजा गोरे, सामाजिक कार्यकर्ते महेश गोरे, निखिल गोरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक,सहदेव ढोले,आदी उपस्थित होते.