बहूजन रयत परिषदेचा आदर्श शाखा अभियंता पुरस्कार सेवानिवृत्त राजेंद्र माळी व अरुण रोडगे यांना प्रदान
Post-गणेश खबोले

लोहारा(इकबाल मुल्ला)
लोहारा तालुक्यातील फणेपुर येथील लोहारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र माळी व लोहारा शहरातील सेवानिवृत्त शाखा अभियंता अरुण रोडगे यांनी सेवेच्या काळात अतिशय उत्कृष्ट काम केल्याबद्धल यांना बहुजन रयत परिषदेचा आदर्श शाखा अभियंता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बहुजन रयत परिषदेच्या वतीने उमरगा लोहारा तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा शाखा अभियंता आदर्श पुरस्कार राजेंद्र माळी व अरुण रोडगे यांना जाहिर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण उमरगा शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात दि.29 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न झाला. बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, आ.ज्ञानराज चौगुले, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेश अध्यक्षा कोमल साळुंके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, जि.प.माजी समाज कल्याण सभापती हरीश डावरे,माजी जि.प. सदस्य दिलीप भालेराव, कार्यक्रमाचे आयोजक बालाजी गायकवाड यांची प्रमुख उपस्थीती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त शाखा अभियंता राजेंद्र माळी यांना आदर्श शाखा अभियंता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी उमरगा लोहारा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांना आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्धल यांचे धाराशिव जिल्ह्यातुन, लोहारा उमरगा तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे