कविता गायकवाड यांची आदर्श नारी पुरस्कारासाठी निवड

कविता गायकवाड यांची आदर्श नारी पुरस्कारासाठी निवड
नळदुर्ग /न्यूज सिक्सर
वागदरी ता.तुळजापूर येथील माजी उपसरपंच तथा सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या माजी अध्यक्षा कविता सिद्राम गायकवाड यांची जिल्हास्तरीय आदर्श नारी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव ता.तुळजापूर च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय आदर्श नारी जिवन गौरव पुरस्कार सोहळा-२०२३ चे आयोजन करण्यात आले असून धाराशिव जिल्ह्यातील काही कर्तव्यदक्ष महिलाना जिल्हास्तरीय आदर्श नारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी वागदरी ता.तुळजापूर येथील माजी उपसरपंच कविता गायकवाड यांची निवड करण्यात आली असून संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव च्या वतीने सदर पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र त्यांना पाठविण्यात आले असून दि.११ मार्च २०२३ रोजी इटकळ ता.तुळजापूर येथील विवांत रिसॉर्ट येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.