
धाराशिव -प्रतिनिधी
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्लाझमा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापरास निर्बंध आदेश काढण्यात आले आहेत
धाराशिव पोलीस अधिक्षक यांनी वाचा क्र. 1 अन्वये पोलीस अधिक्षक यांनी पत्र दिले आहे की, धाराशिव जिल्ह्यात दि. 07/09/2024 ते दि. 17/09/2024 या कालावधीत गणेश उत्सव साजरा होत आहे.तरी जिल्ह्यात गणेश विसर्जन व तसेच ईद-ए-मिलाद हा सण साजरा होणार आहे त्या अनुषंगाने होणाऱ्या विसर्जन मिरवणुका व जुलूस मिरवणुका प्रसंगी विविध गणेश मंडळे व जुलूस मंडळे यांचेकडून प्लाझमा, बीम लाईट व लेझर बीम लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याची शक्यता आहे. प्लाझमा, बीम लाईट व लेझर बीम लाईटचे प्रखर प्रकाशामुळे मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणुक पाहण्यास आलेले लहानमुले,वयोवृध्द,जेष्ठ नागरीक,सामान्य नागरीक यांचे डोळयास इजा होवून त्यांचे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे.आशा अनेक घटना राज्यात घडले आहे. त्यामुळे प्लाझमा, बीम लाईट व लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरुन जाणारे वाहन चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी होऊ घातलेले सण / उत्सव यात अनुषंगाने प्लाझमा, बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर करु नये म्हणून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 163 प्रमाणे बंदी आदेश संपूर्ण धाराशिव जिल्हयात जारी करण्यात आली आहे.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 (1) मध्ये या कलमां खाली जेथे कोणत्याही कारणांने नागरीकांच्या जिवीतास अथवा आरोग्यास धोका निर्माण होईल असे पुरेसे कारण असेल तेंव्हा तात्काळ प्रतिबंध करण्याचे आदेश धाराशिव अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव आणि धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिले आहे.