ब्रेकिंगमहाराष्ट्र
लालबागचा राजाला तुळजाभवानीची एक हाजर एक आंबूके कवड्याची माळ अर्पण करून सेवा पूर्ण केली
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

लालबागचा राजाला तुळजाभवानीची एक हाजर एक आंबूके कवड्याची माळ अर्पण करून सेवा पूर्ण केली
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
लालबागचा राजा गणेशात्सव -२०२४ मुंबईत, “गणेश चतुर्थी” हा हिंदू सण सर्वात लक्षणीय आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा उत्सव आहे. लालबागचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेश मूर्ती हे मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. ही मूर्ती हजारो भाविकांना आकर्षित करते त्याच प्रमाणे दरवर्षी हा सण महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आनंद आणि उत्साह घेऊन येतो. तसेच महाराष्ट्राची आराध्य दैवत श्री तुळजाभवानी देवीचे महंत व माजी नगरसेवक नगर परिषद तुळजापूर यांच्या वतीने लालबाग राजाला आई श्री तुळजाभवानीची एक हाजर एक आंबूके कवड्याची माळ मंहत तूकोजी बूवा , विशाल रोचरकी यांच्या कडून प्रति वर्षाप्रमाणे अर्पण करून सेवा पूर्ण केली.