त्रिशक्ती मंडळाच्या वतीने यंदा प्रथमच सुरु करण्यात आलेला अनोखा उपक्रम
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी,तुळजापूर

त्रिशक्ती मंडळाच्या वतीने यंदा प्रथमच सुरु करण्यात आलेला अनोखा उपक्रम
मंडळाचे जेष्ठ सभासद
यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन मुलींच्या नावावर एक लाख अकरा हजार रुपये
डिपॉजिट करण्याचा निर्णय;आधारस्तंभ नरेश अमृतराव व संतोष छत्रे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील यंदा नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या कुंभार गल्ली, येथील त्रिशक्ती तरुण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करताना मिरवणुकीसह डिजे, अन्य साऊंड सिस्टीम न लावता सामाजिक भान ठेवून सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार कै. सुजित (दादा) साळुंके त्रिशक्ती तरुण मंडळाचे जेष्ठ सभासद
यांच्या निधनानंतर मंडळावर शोककळा पसरलेला असून, मंडळाकडून मिरवणुकीचा अतिरीक्त खर्च टाळुन कुटूंबास आधार म्हणुन वर्गणी गोळा करून त्यांच्या पश्चात असलेल्या २ मुलींच्या नावे, (एक लाख अकरा हजार रुपये) फिक्स डिपॉजिट करण्याचा निर्णय महंत तुकोजी बुवा,महंत वाकोजी बुवा,महंत हामरोजी बुवा,महंत मावजिनाथ बुवा यांच्या शुभ आशीर्वादाने निर्णय
घेण्यात आलेला आहे.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून युवा नेते विनोद गंगणे,तसेच अरविंद बोळंगे तहसीलदार,तुळजापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर तसेच मंडळाचे आधारस्तंभ नरेश अमृतराव व संतोष छत्रे आणि मंडळाचे सभासद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी व पत्रकार , स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते
आधारस्तंभ नरेश (काका) अमृतराव व संतोष (बॉस )छत्रे यांची माहिती
त्रिशक्ती तरुण गणेशोत्सव मंडळाकडून अनावश्यक मिरवणुकीसह डिजे, वा अन्य साऊंड सिस्टीमसाठी लागणाऱ्या खर्चाला फाटा देत गणेश भक्तांसाठी महाप्रसाद सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने मंडळाचे कौतुक होत आहे.