तुळजापूरच्या राजकारणातील राजहंस : माजी प्रभारी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूरच्या राजकारणातील राजहंस : माजी प्रभारी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
२००१ पासून नगरसेवक आणि विविध पदावर काम करताना मिळणारे मानधन नगरपरिषद शाळा क्रमांक ३ ला कायम देणारे नगरीचे प्रभारी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष व कार्यक्षम नगरसेवक श्री. पंडितराव जगदाळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा मित्रपरिवार आणि शहरवासीय त्यांना आज सकाळपासून शुभेच्छा देत आहेत. यानिमित्ताने आम्हा सर्व पत्रकार बंधूंच्याही त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत.
तुळजापूर नगर परिषदेचे चार वेळा नगरसेवक राहिलेले श्री. पंडित जगदाळे असे त्या कार्यक्षम व लोकप्रिय प्रभारी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, विविध समितीचे सभापती, नगरसेवकाचे नाव आहे. नगरपरिषदेच्या विविध पदावर त्यांनी अत्यंत यशस्वीपणे काम केल्यामुळे ते आज लोकांच्या मनातील नगरसेवक बनलेले आहेत. ते जेव्हा प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करत होते त्याच काळात तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तुळजापूर नगर परिषदेला २.५० कोटी रुपयांचा आदर्श नगरपरिषद पुरस्कार देखील प्राप्त झाला. नगरपरिषदेच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या रकमेचा पुरस्कार श्री पंडितराव जगदाळे यांच्या कार्यकाळात मिळाला नगरपरिषद ही सार्वजनिक संस्था असली तरी त्यांच्या कार्यकाळात हा पुरस्कार मिळणे निश्चितच समाधानकारक आहे.
तुळजापूर खुर्द हा त्यांचा प्रभाग तुळजापूर शहराला पूर्वी तुळजापूर खुर्द पासून थोडसं वेगळं समजलं जायचं. प्रत्यक्षामध्ये तुळजापूर खुर्द हा प्रभाग तुळजापूर नगर परिषदेचा पूर्वीपासून भाग आहे. परंतु जन्म माणसांमध्ये अशी मानसिकता होते. सलग २५ वर्षापासून नगरसेवक राहिलेले श्री. पंडित जगदाळे यांनी आपल्या राजकीय कारकिर्ची सुरुवात तुळजाई सांस्कृतिक व सामाजिक संस्थेच्या वतीने केली. पुढे त्यांनी तुळजाई नागरी पतसंस्था देखील मराठवाड्यामध्ये अव्वल कामगिरी करणारी संस्था म्हणून नावारूपाला आणली. ती आज तुळजापुरात एक प्रमुख अर्थवाहिनी म्हणून काम करते आहे.
तुळजाई सांस्कृतिक व सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष आहेत. माजी प्रभारी नगराध्यक्ष पंडितराव यांना समाजकारण करण्याचा लोकांना मदत करण्याचा, लोकांच्या गरजेसाठी आपल्या परीने सहकार्य करण्याचा, त्यांचा मूळ स्वभाव आहे. या मंडळाला २००८ वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार देखील तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. समाजकारण करून गरजवंताला मदत करणे यामध्ये जे समाधान आहे ते समाधान प्राप्त करीत करीत त्यांनी पुढच्या काळात नगरसेवक म्हणून आपले काम तेवढेच प्रामाणिकपणे सुरू ठेवले. एकदा दोनदा तीनदा आणि चारदा नगरसेवक झाल्यानंतर देखील आज श्री. पंडित जगदाळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे वावरतात हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे अत्यंत महत्त्वाचे आणि इतरांना मार्गदर्शक ठरावे असे वैशिष्ट्य आहे.
राजकारणामध्ये नगरसेवक झाल्यानंतर इतर लोक काय करतात हे न पाहता माझ्या तुळजापूर खुर्द प्रभागासाठी” मला जे जे करता येईल ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन” अशा प्रकारचा निश्चय मनामध्ये बांधून त्याची फारशी चर्चा न करता आणि त्याला कोणतीही प्रसिद्धी न देता एकामगून एक विकासाची काम तुळजापूर खुर्द या छोट्याशा प्रभागांमध्ये श्री.पंडित जगदाळे करू लागले आणि पाहता पाहता मागील १५ वर्षांमध्ये हा प्रभाग आपलं पूर्वीच रूप बदलून आज एक “विकसित प्रभाग” म्हणून मराठवाड्यामध्ये लोकप्रिय आहे. या प्रभागामध्ये पंडित जगदाळे यांनी पुढाकार घेतला आणि आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन तुळजाई सांस्कृतिक व सामाजिक संस्था विविध सामाजिक उपक्रम व्याख्यानमाला रक्तदान शिबिर गणेशोत्सव शिवजयंती आणि शारदीय नवरात्र महोत्सव याशिवाय नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत कार्य करणे, अशा प्रकारची वेगवेगळे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमांची मालिका करण्यामध्ये पंडित जगदाळे यांना प्रचंड यश मिळाले. त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी देखील त्यांना तेवढेच प्रामाणिक आणि एकमेकाला समजून घेणारे आहेत .
एकमेकांना समजून घेणारी तरुण पिढी जेव्हा समाजकारणामध्ये सक्रिय होते आणि माझ्या प्रभागासाठी माझ्या लोकांसाठी माझ्या भविष्यातील येणाऱ्या पुढच्या पिढ्यासाठी काही ना काही चांगलं केलं पाहिजे अशा प्रकारची सद्भावना घेऊन ही मंडळी मागील २५ वर्षापासून सातत्याने सामाजिक कामांमध्ये सक्रिय राहते. ही सार्वजनिक जीवनातील सकारात्मकता तुळजापूर खुर्द येथे तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था स्थापनेमध्ये आहे. ही पतसंस्था आज १३० कोटी रुपये उलाढाल आहे. लघुउद्योग, छोटे उद्योग, आणि मध्यम उद्योग करणाऱ्या लोकांना ही पतसंस्था सन्मानपूर्वक कर्ज देते आणि १०० टक्के वसुली करून पतसंस्था आणि कर्जदार या दोघांची हित जोपासते.
तुळजाई पतसंस्था तुळजापूर खुर्द या पतसंस्थेचे पिग्मी संकलन करणारे लोक या सांस्कृतिक मंडळ व पतसंस्थेचे कार्यकर्तेच आहेत. हे विशेष आहे. सुशिक्षित बेकारांना काम देण्याच्या उद्देशाने या पतसंस्थेने खूप चांगले काम केले आहे. जे लोक या पतसंस्थेमध्ये काम करतात ते लोक आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. आपल्या कुटुंबाला देखील त्यांनी स्थिर केलेले आहे त्याचबरोबर पतसंस्थेला देखील प्रगतीपथावर आणली आहे. राजेंद्र देशमाने हे आज चेअरमन आहेत.
एक सामान्य तरुण एक सामान्य कुटुंबातील तरुण एक सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण काहीतरी आपल्या हातून चांगलं झालं पाहिजे अशी जिद्द बाळगणारा एक तरुण पंडित जगदाळे आज ५१ वर्षे पूर्ण करून ५२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत आयुष्याची 25 वर्षे या तरुणांनी आपल्या प्रभागासाठी दिली. संपूर्ण तुळजापूर शहर आणि मराठवाड्याच्या अनेक शहरांमध्ये पंडित जगदाळे हे नाव आज परिचित आहे ते केवळ केलेल्या प्रामाणिक कामामुळे.
आयुष्याच्या ५१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता आता थांबलं पाहिजे अशा मानसिकतेमध्ये असतो परंतु एका प्रभागांमध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माच्या सर्व लोकांना सोबत घेऊन काम करीत असताना शासनाच्या वेगवेगळ्या योजना प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत हा मनातील निर्धार त्यांनी बांधलेल्या ९ सभागृहावरून सिद्ध होतो. आज तुळजापूर शहरामध्ये सामान्य एखाद्या एनजीओ संस्थेला स्पर्धा अथवा पन्नास लोकांचा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर एकही सभाग्रह नाही . तुळजापूर खुर्द येथे पंडित जगदाळे यांनी नगरसेवक म्हणून एक नवे दोन नवे आपल्या कारकिर्दीत ९ सभागृह बांधले हा एकाच नगरसेवकाच्या कारकिर्दीचा आणि विकास कामांचा उच्चांक देखील असू शकतो.
तुळजापूर खुर्द येथे नगरपरिषद शाळा क्रमांक 3 मध्ये अत्यंत दर्जेदार शिकवला जातो म्हणून ही शाळा मराठवाड्यामध्ये पुरस्कार प्राप्त ठरली. या प्रशालेने ई लर्निंग आणि संगणकाचे शिक्षण या बाल मुलांना विद्यार्थ्यांना देण्यासाठी खूप चांगले उपक्रम सुरू केलेले आहेत विविध उपक्रमामुळे आणि गुणवत्ता कायम ठेवल्यामुळे मराठवाड्यातील सर्वोत्तम आदर्श शाळा असा पुरस्कार या प्रशालेस प्राप्त झाला हा संपूर्ण तुळजापूर शहराचा सन्मान आहे.
वाढदिवस सगळेच करतात, सगळ्यांनाच कौतुक व्हावे वाटते, परंतु आपला वाढदिवस देखील आपल्या कुटुंबासह साजरा करण्याची पंडित जगदाळे यांची परंपरा आहे. 13 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस आहे. या तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार माणिकराव खपले यांनी पंडित जगदाळे यांचा स्वभाव लक्षात घेऊन त्यांना पहिल्यांदा 2001 मध्ये राजकारणामध्ये संधी दिली नगरसेवक पद मिळाल्यानंतर त्यांनी जे काम केले त्यामधून त्यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार शिक्षण महर्षी सि. ना. आलुरे गुरुजी, आमदार सुरेश धस, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार श्रीकांत जोशी, माजी आमदार ना.स. फरांदे, अशा विविध मान्यवरांनी तुळजाई सांस्कृतिक मंडळ आणि तुळजाई नागरी पतसंस्था यांच्या कामाचे कौतुक करत पाठीवर शासकीची थाप दिलेली आहे प्रत्येक संधीचं सोनं करून तुळजापूर खुर्द परिसरात जी विकासाचे काम झालेले आहेत त्यामुळे तुळजापूर खुर्द हा प्रभाग केवळ मराठवाडाच नाही तर महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीमध्ये एक आघाडीचा प्रभाग म्हणून इतिहासामध्ये नोंद करेल यामध्ये काहीही शंका नाही. श्री . पंडित जगदाळे हे भविष्यामध्ये ही खूप चांगले काम करतील, त्यांच्या हातून विकासाचे चांगले काम होऊ येथील तरुणांना रोजगाराची मोठी संधी कायम मिळत राहो. अशा प्रकारची सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो.