होळी येथे साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी
Post-गणेश खबोले

लोहारा -प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील होळी येथे साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज कोकाटे तर उद्घाटक म्हणून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक महेश देशमुख हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचारवंत लेखक समाजिक कार्यकर्ते अँड.शितल चव्हाण,शिवशक्ती, भिमशक्ती,लहूशक्तीचे नेते,अशोकराजे सरवदे,माजी समाजकल्याण सभापती मा. हरीश डावरे, एस. के. चेले, कॉंग्रेसचे उमरगा तालुका अध्यक्ष अँड.सुभाष राजोळे, संजय सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, वंचित बहजन आघाडीचे राम गायकवाड, नेताजी गायकवाड, धिरज बेळंबकर, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भाऊ बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष राजाभाऊ शिंदे, डॉ. चंद्रशेखर गायकवाड सरपंच सौ. सरोजा ओम बिराजदार, माजी. सरपंच लक्ष्मण राठोड, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष रामभाऊ जाधव, संजय बिराजदार, मारुती जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे स्वागतअध्यक्ष बालाजी सरवदे ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती दौंड यांनी उपस्थितांचे स्वागत स्वागत करुन प्रास्ताविक केले तर सुत्रसंचलन व आभार केशव सरवदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष ईदुकर शिंदे आणि सर्व पदाधिकाऱ्यांसह अँड.सुखदेव होळीकर,प्रताप होळीकर, कृष्णा सरवदे, मारुती शिंदे, संदीप पाटोळे आदींनी परिश्रम घेतले. या नंतर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्य हालगी पथकाच्या कडकडाट भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे, कांतू राठोड आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.