जवाहर नवोदय विद्यालय येथे विद्यालय प्रबंधन व नियोजन समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक
Post-गणेश खबोले

तुळजापूर-प्रतिनिधी
पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय तुळजापुर जिल्हा धाराशिवची V.M.C आणि V.A.C ची बैठक विद्यालयाचे प्राचार्य श्री. के.वाय.इंगळे सर यांच्या कल्पक आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली दिनांक २८/०८/२०२४ , बुधवारी विद्यालयात यशस्वीरित्या पार पडली:
जिल्हाधिकारी जिल्हा धाराशिव आणि विद्यालय प्रबंधन व नियोजन समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद धाराशिव डॉ. माणिक घोष , जिल्हा शिक्षणाधिकारी. श्रीमती सुधा साळुंके, जिल्हा.सिव्हिल सर्जन प्रतिनिधी श्री.जाधव,जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव कार्यकारी उपविभाग अभियंता,श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. रवींद्र आडेकर, तुळजापुरचे शिक्षणतज्ज्ञ व वाय सी.कॉलेजचे प्राध्यापक डॉ. सतिश कदम, पालक अध्यापक समिति प्रतिनिधी डॉ. रामेश्वर यादव आणि श्रीमती ए.एन बोडके हे मान्यवर 28/08/2024 रोजी विद्यालयात झालेल्या या विद्यालय नियोजन आणि विद्यालय परामर्श कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित होते.
या मीटिंग मध्ये धाराशिव नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री. के . वाय इंगळे सर यांनी मांडलेल्या विद्यालयासाठी संगणक ,पाणी, सतत वीज, विद्यालयासाठी बहुउद्देशीय हॉल, आर.ओ. सिस्टीम ,अंतर्गत सडक सुधार या सर्व मागण्या, जिल्हा प्रशासनामार्फत, धाराशिव जिल्ह्यातील सर्व जबाबदार संबंधितांच्या सहकार्याने लवकरच पूर्ण केल्या जातील, असे जिल्हाधिकारी व व्हीएमसीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे सर यांनी बैठकीत सांगितले.
कार्यक्रमात प्रारंभी विद्यालयातर्फे सर्वांचे पारंपारिक टिळा लावून,शब्दसुमनाद्वारें, स्वागतगीताद्वारें, एन सी.सी व स्काऊट गाईड विद्यार्थ्याव्दारे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेखा प्राचार्य के.वाय. इंगळे यांनी मांडली सूत्रसंचालन चक्रपाणी गोमारे यांनी केले आणि आभारप्रदर्शन वरीष्ठ अध्यापक श्री. सचिन खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री . एम पी.कुलकर्णी, श्री.रामकुमार शुक्ला,श्री. आय ए.शेख,श्री. डी. एस. उस्तूरगे, श्री धनाजी देशमुख, श्री .बस्वराज, श्री हरी जाधव, श्री. पुरुषोत्तम जोशी, श्री. संजय माने, श्री. निषाद, श्री. बनसुडे आणि सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.