तुळजापूर नगर परिषदच्या ठेकेदारांची पार्किंग वसुलीचे अधिकार तात्काळ रद्द करावेत
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर नगर परिषदच्या ठेकेदारांची पार्किंग वसुलीचे अधिकार तात्काळ रद्द करावेत
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगर परिषद ठेकेदार में.भवानी शंकर पार्किंग नियमांचे उल्लंघन व थकबाकी मुळे ठेकेदाराच्या शहरातील विविध ठिकाणी पार्किंगच्या नावाखाली भाविकांकडून अनाधिकृत वसुली करीत आहेत ही वसुली कधी बंद होणार ? तरी काही वेळा भाविकांनी पैसे न दिल्यास भाविकांना अरर्वोच्च भाषावापरून जब्बार मारहाण केली जात आहे तशी पोलीस प्रशासनाकडे तक्रारही दिलेली आहे. भाविकास मागील दिनांक ७ जानेवारी रोजी मारहाण झाल्याबद्दल दि. ८ जानेवारी रोजी बाय रजिस्टर पोस्टाद्वारे पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल आहे अपंग भाविक बरोबर किंवा वयोवृद्ध भाविका बरोबर तक्रार झाल्यास मारहाण करण्यासाठी गुंड प्रवृत्तीचे लोक यांनी पाळलेले आहेत.
दिव्यांग अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक आहे तरी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे व नूतन पोलीस अधीक्षक यांनी याप्रकरणी स्वतः लक्ष देऊन भाविकांचे होणारे हेळसांड व आर्थिक फसवणूक थांबवावी भाविक भक्तांकडून मागणी होत आहे.जेणेकरून तीर्थक्षेत्र तुळजापूरचे बदनामी थांबेल व भाविक भक्तांना मोठा दिलासा मिळेल.
– रविंद्र साळुंके,तालुका अध्यक्ष छावा संघटना, तुळजापूर.
जखमी भाविकाला खाजगी रुग्णालयात उपचार करून ठेकेदाराच्या पडद्याआड चे महाठक गोड बोलून त्यांच्या गावी परत पाठवितात तुळजापूर पोलीस ठाणे येथे पोस्टाद्वारे संबंधित प्रकरणी सजत नागरिक म्हणून तक्रार दिलेले आहे अद्याप आठ महिने उलटून गेले तरी नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी कसलीच कडक कारवाई केलेले नाही