श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जागी कौशल्य विकास विद्यापीठ स्थापनेस तीव्र विरोध – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जागी कौशल्य विकास विद्यापीठ स्थापनेस तीव्र विरोध – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जागी कौशल्य विकास विद्यापीठ काढण्याच्या नावाखाली अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करण्याचा डाव विश्वस्त आमदार करीत आहेत ,त्यास आपला तीव्र विरोध आहे गरज पडल्यास यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनीशासकीय विश्राम गृह येथे दि.२२ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
माजी मंत्री चव्हाण यांनी गुरुवारी दुपारी तालुक्यातील विविध विषयावर पत्रकार परिषद घेतली. यात श्री तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विषय, महिला व मुलीच्या सुरक्षेबद्दलचा सामाजिक विषय व शहरातील शैक्षणिक संस्थेबद्दल त्यांनी सविस्तर पत्रकार परिषदेत घेतली .यावेळी त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करून त्या जागी कौशल्य विकास विद्यापीठ स्थापण्याचा काहीजण घाट घालत आहे याला आमचा विरोध असून हे विकास विद्यापीठ जिल्ह्याच्या ठिकाणी धाराशिवला करावे त्याला आपला पाठिंबा आहे. तुळजापुरातील शैक्षणिक संस्थेत स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे तुळजापूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय हे मिळाले आहे. श्री तुळजाभवानी मंदिर पेडपास हे ऑनलाईन पद्धतीने करणार आहे याला आपला विरोध आहे कारण यामुळे पुजारांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. यासाठी मंदिर संस्थांननी याचा पुनर्विचार करावा असे त्यांनी सांगितले. रेल्वेसाठी संपादीत जागेचा मावेजा हा खूप कमी देण्यात येत आहे याला आपण विरोध केला असून दर हा राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे देण्यात यावा असे पत्र आपण तीन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी यांना दिले आहे .त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. बदलापूर येथील बालिकावरील अत्याचाराची घटनेला देखील सरकार राजकीय रंग देत आहे हे मोठे दुर्दैव आहे. वास्तविक ही घटना पाच दिवसानंतर उघड झाली मग पाच दिवस सरकारने काय केले आरोपी मोकाट कसा राहिला याचा विचार न करता सरकार विरोधकावर राजकारणाचा आरोप करीत आहे. आम्ही राजकारण करीत नाहीत आम्हाला फक्त मुली व महिलांच्या सुरक्षिततेची हामी सरकारने द्यावी मग आम्ही आंदोलन करणार नाहीत असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी युवा नेते ऋषिकेश मगर ,मुकुंददादा डोंगरे , माजी नगरसेवक सुनील रोचकरी, अमर चोपदार,शरद जगदाळे, माजी सभापनी शिवाजी गायकवाड, ॲड, राम ढवळे,धनंजय मगर तसेच तौफिक शेख आदि उपस्थित होते.