
लोहारा-प्रतिनिधी
धाराशिव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांच्याशी धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा धाराशिव यांच्या शिष्टमंडळाने चर्चा विचारविनमय करून प्रलंबित असलेल्या मागणी बाबत निवेदन दिले.
५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन आहे. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्न निकाली नाही निघाल्यास शिक्षक समितीच्या वतीने दि.५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद धाराशिव कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणिक उपोषण करणार करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने सांगण्यात आले.
निवेदन देते वेळी राज्य कार्यकारिणी सदस्य कल्याण बापू बेताळे,मराठवाडा सरचिटणीस शिवाजी कवाळे,जिल्हाध्यक्ष रमेश बारस्कर,जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण बनसोडे,जिल्हा संपर्कप्रमुख रामदास होरे,जिल्हा उपाध्यक्ष अंकुश गवळी,लोहारा तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे,पंरडा तालुकाध्यक्ष नागनाथ देशमुख,उमरगा तालुका सोसायटी संचालक नागनाथ मुळे यांच्यासह समिती पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.