
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा येथील तहसीलदार यांचे नवीन निवासस्थान बांधकामाला अवघ्या काही महिन्यांत या इमारतीला अनेक ठिकाणी तडे जाऊन भिंतीला भेगा गेल्या आहेत.
लोहारा हे तालुक्याचे ठिकाण असून शासनाने तालुका तेथे तहसीलदार निवासस्थानासाठी लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव अंतर्गत लोहारा येथे ५ फेब्रुवारी २०२० रोजी तहसीलदार निवासस्थानाचे बांधकामांचे भुमिपुजन झाले आणि ७ डिसेंबर २०२१ ला ते काम पूर्ण झाल्याचे दर्शनी बोर्ड लावुन गुंतेदाराने नुसता देखावा करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने बिले उचले असले तरी हे निवासस्थान लोहारा तहसीलदार यांनी ताब्यात घेण्यापूर्वीच सलॅपचा काही दर्शनी भाग जागोजागी गळुन पडत असल्याचे दिसून येताच संबंधित गुतेदारांनी तात्काळ नुसती डागडुजी केली पण भिंतीला अनेक ठिकाणी भेगा जाऊन भिंती खचल्याचे वृत्त प्रकाशित करुन हि अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याने नागरीकांतुन तर्क वितर्क काढला जात आहे लोहारा येथील नवीन तहसीलदार निवासस्थान बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून हि धोकादायक इमारत केव्हा खाली येईल हे सांगता येत नाही परंतु शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याची चर्चा मात्र ऐकण्यास मिळत आहे.अवघ्या काही महिन्यांत नवीन इमारत बांधकामाला जागोजागी तडे गेल्याने सार्वजनिक बाधकाम विभागाचे संबंधित अधिकारी व गुतेदारात अर्थपुर्ण व्यवहारातुन लोहारा येथील तहसीलदार निवासस्थान बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे बोले जात आहे. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ समिती गठीत करून या कामाची चौकशी करून संबंधित गुतेदारांना व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.