तुळजापूर येथील रहिवाशांच्या वतीने भागातील घान आपल्या कॅबीनमध्ये ठाकुन लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल – सुनिल घाडगे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर येथील रहिवाशांच्या वतीने भागातील घान आपल्या कॅबीनमध्ये ठाकुन लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल – सुनिल घाडगे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
वेताळ नगर तुळजापूर येथील सोंजी भवन समोरील नाली मधुन घान पाणी बोअरवेल मध्ये जाऊन बोअलरवेलचे पाणी दुषित होत असल्यामुळे नालीची दिशा बदलणे बाबत तसेच वेताळ नगर येथील स्वच्छता व किटकनाशक फवारणी बाबत दि.९ ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की, वेताळ नगर तुळजापूर येथे सोंजी भवन समोरील नाली मधुन घान पाणी बोअरवेल मध्ये जात असुन त्यामुळे बोअलरवेलचे पाणी दुशित होत असल्याने ते पिण्यास योग्य नसल्याने पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे सदर नाली पुर्व पश्चिम असुन त्याऐवजी सदर नाली दक्षिणेकङ्गफन उत्तरेकडे नालीची दिशा बदल्या नंतर सोईचे होणार आहे. तरी सदर नालीची दिशा बदलण्यात यावी.
तसेच बेताळ नगर येथील राजाभाऊ दिक्षत यांच्या घराच्या उत्तर वाजुस असलेले सार्वजनिक शौच्यालय असुन सदर ठिकाणी गेली अनेक महीन्यापासुन शौच्यालयाची स्वच्छता झालेली नाही. भागात अनेक महीन्या पासुन शौचालयाचा वापर करण्याऐवजी उघड्यावर शौच्यास बसत आहेत.. त्यामुळे भागात अतिषय घान पसरली असुन त्यांची दुर्गंधी भागामध्ये पसरत आहे. तसेच भागामध्ये डास व ढेकुन यांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन तेथील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे तसेच डेंग्यु या आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी तात्काळ स्वच्छता होने व किटक नाशक फवारणी करने गरजेचे आहे.
तसेच वेताळ नगर तुळजापूर येथील नविन मराठी शाळा व येथील पसिरातुन येणारे पावसाचे नालीतील पाणी हे अनिल वाकळे यांच्या घरामध्ये जात आहे. तरी नाली दिशा बदलण्यात यावी.
तसेच वेताळ नगर येथील स्वच्छता, नाली सफाई, किटक नाशक फवारणी बाबात नगर परिषद जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत असुन दुजाभाव करत आहे. तरी आपण वेताळ नगर तुळजापूर येथील स्वच्छते वावत संबंधीत विभागास आदेश देवुन तात्काळ स्च्छता व किटक नाशक फवारणी करुन घ्यावी अन्यथा वेताळ नगर तुळजापूर येथील रहिवाशांच्या वतीने सदर भागातील घान आपल्या कॅबीनमध्ये ठाकुन लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जवाबादारी नगर परिषदेची राहील याची नोंद घ्यावी असा एका लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. या निवेदना वर भ्रष्टाचार विरोधी जन अंदोलन सुनिल घाडगे यांची स्वाक्षरी आहे.