श्री मुटकुलेश्वर देवस्थान येथे सोमवार पासुन यात्रेस प्रारंभ !
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्री मुटकुलेश्वर देवस्थान येथे सोमवार पासुन यात्रेस प्रारंभ !
स्व:अरुण (काका ) कंदले,
स्वःपुष्पा (काकी ) कंदले यांच्या स्मरणार्थ महिलांसाठी मोफत वाहन सेवा !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री मुदुगुलेश्वर देवस्थान येथे स्व:अरुण (काका ) कंदले व स्वःपुष्पा (काकी ) कंदले यांच्या स्मरणार्थ महिलांसाठी दि.५ ऑगस्ट पासून महिनाभर मोफत वाहन सेवा केली आहे.आयोजक आनंद कंदले यांनी केले आहे.रोज विविध रंगाच्या फुलांनी मंदिराची सजावट करण्यात येते तसेच महादेवाची पिंड ही दररोज वेगवेगळ्या विविध कलाकुसर मध्ये रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात येते
तुळजापूर शहरापासून काही अंतरावर सिंदफळ तीन किलोमीटर अंतरावर असलेले श्री मुघलेश्वर देवस्थान येथे मागील अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे. या देवस्थाना मध्ये मागील अनेक वर्षापासून दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्यात यात्रा भरवली जाते. हि यात्रा संपुर्ण श्रावण महिन्यात एक महिनाभर यात्रा भरते.
धाराशिव जिल्ह्यातील व तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून मुद्गुलेश्वर देवस्थान येथे मंदिरात दर्शनासाठी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. या श्रावण महिन्यात दरवर्षी या मुद्गुलेश्वर देवस्थान यात्रेस धाराशिव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातुन शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थीनीची शैक्षणिक सहल ये – जा होते. या देवस्थान च्या भोवताली गवताचे हिरवागार असलेले गवत , झाडे बघण्यासाठी परिसर आहे. श्री तिर्थक्षेत्र देवस्थानला मिनी महाबळेश्वर च्या स्वरूपात ओळखले जाते.स्थानिक माजी नगरसेवक विशाल रोजकरी तसेच शहरातील युवा उद्योजक लास्ट च्या सोमवारी अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करतात यावेळी परिसरातील हजारोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित असतात.