माजी मंत्री चव्हाणयांच्या वाढदिनी सत्कार की, विधानसभेचे शक्ती प्रदर्शन ; चव्हाण यांनी जपले राजकीय ऋणानुबंध
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

माजी मंत्री चव्हाणयांच्या वाढदिनी सत्कार की, विधानसभेचे शक्ती प्रदर्शन ; चव्हाण यांनी जपले राजकीय ऋणानुबंध
उद्योजक अशोकराव जगदाळे व मधुकरराव चव्हाण कट्टर विरोधक वाढदिवसादिनी एकत्र !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
माजीमंञी माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या ९० व्या वाढदिवसा निमित्ताने श्रीनाथ मंगल कार्यालयात येथे भव्य सत्कार करण्यात आला.
माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची जोरदार चर्चा असून हा वाढदिवसाचा सत्कार होता की, आगामी विधानसभा निवडणुकीचे शक्ती प्रदर्शन असा भव्य दिव्य कार्यक्रम झाला. चव्हण यांनी आपले राजकीय ऋणानुबंध जपल्याचे पाहायला मिळाले.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे सध्या काँग्रेस मधुन तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून मोर्चे बांधणी सुरू केल्याचे चित्र आहे. या वाढदिवस सत्काराचे नियोजन पाहिले असता संपूर्ण विधानसभा मतदारसंघात मार्केटिंग केल्याचे पाहायला मिळाले.
वाढदिवस गौरव समितीने तुळजापूर शहरात असलेल्या दि.४ ऑगस्ट रोजी श्रीनाथ मंगल कार्यालयात नळदुर्ग तुळजापूर रोड येथे सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. बाहेर प्रवेशद्वारात सत्कारमूर्ती मधुकरराव चव्हाण यांचे आगमन होताच हलगीच्या कडाक्यात मोठ्या उत्साहात स्वागत केले.
यावेळी व्यासपीठावर
काँग्रेस नेत्या डाँ स्मिता शहापुरकर ‘अशोक मगर , माधवराव कुतवळ,भागवत धस , माजी बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे , अशोक पाटील , प्रकाश चव्हाण , उद्योजक अशोक जगदाळ ,अँड रामचंद्र ढवळे , सिद्रामआपा मुळे , नळदुर्ग माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी , सयाजीराव देशमुख , जनता बँकेचे विश्वास शिंदे , मोदानी , धनराज मुळे , बालाजी धुगे , दिलीप सोमवंशी , धनंजय पाटील , शरद नरवडे ,
यावेळी सत्कारास उत्तर देताना मधुकर चव्हाण पुढे म्हणाले कि
मी आजपर्यत जन्मदिन साजरा केला नाही या दिवशी मी देवधर्म देवदर्शनाथ तिर्थक्षेञी जातो पण यंदा कार्यकत्यांचा आग्रह नाकारु शकलो नाही म्हणून मी प्रथमच वाढदिवस प्रमाणात साजरा करून घेतोय असेच तुमचे प्रेम माझावर राहु द्या माझे कायम तुमचावर राहिल
तुमच्या शुभेछेने मला काम करण्याची उर्जा ताकद मिळाली आहे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवण्याचे काम इमान इतबारे केले तसेच शहरवासियांचे कामे करताना आधी तुळजापूर करांना विचारायाचे मगच मगच विकास काम करायाचे मी अनेक कार्यकते निर्माण केले .मी तालुक्यातील जनतेच्या मुलभुत समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले सर्वजातीधर्माला मी आपला वाटतो कारण जात न बघता मानवता बघुन काम केले. मला मोठे करण्यात सर्वांचा सहभाग आहे.
