न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

उमरगा लोहाऱ्याचा गड अभेद्य ठेवण्यासाठी एकदिलाने काम करा –विधानसभा निरीक्षक नितीन लांडगे

Post-गणेश खबोले

 

लोहारा/प्रतिनीधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमरगा लोहारा विधानसभा निरीक्षक नितीन लांडगे यांनी
उमरगा लोहारा तालुक्यातील पक्षबांधणीचा आढावा घेत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आमदार ज्ञानराज चौगुले यांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. मागील २.५ वर्षांच्या काळात आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाच्या विकासासाठी भरघोस निधी मंजुर करून आणला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जिवनातील अडचणी सोडविण्यासाठी सहजरित्या उपलब्ध होणारा लोकप्रतिनीधी म्हणुन त्यांची ओळख आहे. राज्यातील सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध असल्याने भविष्यात याचा उमरगा लोहारा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग होऊ शकतो, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांना युवती सेना विभागीय निरीक्षक आकांक्षा चौगुले यांनीही मार्गदर्शन केले. सध्या शिवसेना सदस्य नोंदणी अभियान सुरू असुन शिवसैनिकांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून घर तेथे शिवसैनिक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे यावेळी बोलताना त्या म्हणाल्या. सदर बैठकीस विधानसभा निरीक्षक नितीन लांडगे, गणेश जगताप, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, विलास भगत, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील, संध्याताई शिंदे, लताताई भोसले, मिनाक्षीताई दुबे, शाहूराज सावंत, राजेंद्र शिंदे, दीपक जोमदे, मुरूम शहरप्रमुख सुरेश मंगरूळे, उमरगा शहरप्रमुख योगेश तपसाळे, विधानसभा अध्यक्ष शरद पवार, दत्ता मोरे, परवेज तांबोळी, अनिल बायस, भगत माळी, फजल कादरी, जितेंद्र कदम, हणमंत गुरव, मनोज जाधव, सुरेश दंडगुले, पतंग पवार, दत्ता मोरे, संदीपान बनकर, महादेव बिराजदार, संजय गायकवाड, दत्ता डोंगरे, खयुम चाकुरे, तुकाराम जाधव, राजु कारभारी, लिंगराज स्वामी, फजल कादरी, बालेपीर शेख, हरी भोसले, संदीप चौगुले, काशिनाथ पाटील, सरपंच व्यंकट कागे, लिंगराज स्वामी, अमर शिंदे, विनोद मुसांडे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे