ईदगाह मैदानातील विविध विकास कामाचे भुमिपुजन,आ.ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याला यश
Post-गणेश खबोले

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनीधी
उमरगा शहरातील गुंजोटी रस्त्यालगत असलेल्या ईदगाह मैदान परिसरात विविध विकास कामासाठी एक कोटी रूपये मंजूर असलेल्या कामांचे भूमिपुजन रविवारी दि.28 जुलै 2024 रोजी करण्यात आले. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पाठपुरावा करुन अल्पसंख्याक विकास निधीतुन ईदगाह मैदानाच्या सरंक्षक भिंतीसह अन्य विकास कामासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे भूमिपुजन माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, कृषि बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, प्रा.डॉ.शौकत पटेल, जाहेद मुल्ला, मुजीब इनामदार, निजाम व्हंताळे, गुलामनबी मौलाना, मुफ्ती सनयोद्दीन, हाफिज सादिक, जाफर कारचे, हाफिज युसूफ, मकतूम शेख, अमजद मणियार, शौकत औटी, शमशोद्दिन जमादार, लायकसाब शेख, इरफान चौधरी, उस्मान मुल्ला, सलमान शेख, महंमद मुजावर, इस्माईल शेख, सत्तार मुल्ला, बिलाल काझी, इसाक शेख आदींची उपस्थिती होती. दरम्यान ईदगाह मैदानातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रा. गायकवाड यांनी राज्यातील महायुतीचे सरकार सर्व जाती, धर्म व समाजाचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आमदार चौगुले यांनी मुस्लिम समाजाच्या आर्थिक उन्नतीबरोबरच अनेक ठिकाणी विकास निधीतुन कामे मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे प्रा.बिराजदार यांनी मुस्लिम समाज बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले. या वेळी शहर व परिसरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते.