
लोहारा – सुमित झिंगाडे
लोहारा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत भारतीय खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी शाळेत विविध प्रकारच्या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे, शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या सप्ताह साजरा करण्यात येत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापनदिना निमित्त दि २२ जुलै ते २८ जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, या निमित्ताने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य तयार केले, दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी निपुण प्रतिज्ञा म्हटली गणित खेळ व भाषिक खेळाचे आयोजन करण्यात आले, तिसरा दिवस क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला, चौथ्या दिवशी सांस्कृतिक दिवसात विविधता, जागतिक, जागरूकता, पाचव्या दिवशी डिजिटल शिक्षणाचे फायदे सार्वत्रिक करणे, २०० टी व्ही चायनलचा प्रचार करणे, सहाव्या दिवशी शाळेत नवीन इको क्लब स्थापन करणे, वृक्षारोपण करणे, सातव्या दिवशी शाळेचे सक्षमीकरण करणे, मदत करणाऱ्याची नावे फलकावर लिहिणे, तसेच शाळेत भारतीय खेळाचे आयोजन करण्यात आले, त्यात लघूरी, गोठ्या, खो – खो, कबड्डी, लंगडी, इत्यादी खेळाचे आयोजन करण्यात आले, दररोजच्या लावून दिलेल्या उपक्रमानुसार दररोज एक उपक्रम राबवीला जात असून , नूतन प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख विश्वनाथ चंदनशिवे,मुख्याध्यापक मधुकर रोडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे,