उमरगा तालुका शिक्षक पतसंस्थेच्या नूतन संचालकाचा व नूतन तालुका कार्यकारिणीचा आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सत्कार
Post-गणेश खबोले

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनीधी
उमरगा तालुका शिक्षक पतसंस्थेचे पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती. यामध्ये सोसायटी विकास पॅनलचे पॅनल प्रमुख विलास कंटेकुरे, प्रचार प्रमुख शिवाजी कवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व तेरा उमेदवार निवडून आले आहेत. त्यापैकी चेअरमन म्हणून कुंडलिक राठोड, सचिव म्हणून बिभीषण सुरवसे, व्हाईस चेअरमन म्हणून संतोष बोडरे, खजिनदार किशोर गायकवाड, संचालक उमेश खोसे, इब्राहिम चौधरी शिवमुर्ती स्वामी, परमेश्वर साखरे, लक्ष्मण बनसोडे, नागनाथ मुळे, पद्माकर पाटील महिला प्रतिनिधी संचालक निर्मला यादव, प्रमिला तुपेरे यांची एकमताने निवड करण्यात आली. या सर्वांचा सन्मान उमरगा – लोहारा तालुक्याचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते रत्नकांत सगर हे होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, ह.भ.प.शेखर पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील, मान्यवर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची तालुका कार्यकारणी राज्य उपाध्यक्ष विलास कंटेकुरे व विभागीय सरचिटणीस शिवाजी नाना कवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. त्यात तालुका नेते गोविंद कुंभार, शिक्षक नेते संजय लिंबारे, तालुकाध्यक्ष म्हणून विलास तोरसले, तालुका सरचिटणीस प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष महेश बदले, कोषाध्यक्ष उमाचंद्र सूर्यवंशी, संपर्कप्रमुख उस्मान मुजावर यांची निवड करण्यात आलेली आहे. या सर्वांचा सन्मान आमदार चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षक समिती शिलेदार बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नेते प्रदीप मदने सर यांनी केले. तर आभार शेखर पाटील यांनी मानले.