
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा नगरपंचायत च्या वतीने पावसाळयामुळे वाढलेली झुडूपे,गवत,झाडांच्या फांद्या इत्यादींची छाटणी करून झाडांचा पाला-पाचोळा, कचरा आदी संकलित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
शहरातील मुख्य रस्ता असलेले पाटोदा रोड,जेवळी-माकणी रोडवर असलेल्या दुभाजकातील झाडाच्या फांद्या छाटणीचे काम हाती घेण्यात आले आहे.रस्त्याच्या दुभाजका मध्ये असलेले झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या होत्या. दुसऱ्या बाजुने ये जा करणारी वाहने आणि नागरिक रस्ता ओलांडत असतांना त्या फांद्या अडसर करत होते. यावेळी आनावश्यक फांद्या ची छाटणी नगरपंचायत कडून करण्यात आली.