ब्रेकिंग
धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूकीत उमरगा तालुक्यातील विजयाचे किंगमेकर भाजपाचे नेते अभय भैय्या चालुक्य यांचा भाजपाच्या वतीने सत्कार
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशन निवडणूकीत उमरगा तालुका प्रतिनिधी व जिल्हा प्रतिनिधी अशा दोन्ही जागेवर दणदणीत विजय मिळविला. या विजयासाठी भाजपाचे नेते तथा भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अभय भैय्या चालुक्य यांचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे भारतीय जनता पार्टी उमरगा तालुका यांच्या वतीने अभय भैय्या चालुक्य यांचा सत्कार भाजपा तालुकाध्यक्ष शाहजी भैय्या पाटील व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उमरगा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.