लोहारा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे पुरस्कृत नगरसेवक अमीन सुबेंकर यांची बिनविरोध निवड
Post- गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी शिवसेना पुरस्कृत नगरसेवक अमीन सुबेंकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लोहारा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दि.6 फेब्रुवारी 2025 रोजी विशेष सभा नगरपंचायत च्या सभागृहात बोलाविण्यात आली होती. दुपारी 12 वाजता पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, उमरगा गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उमेदवार अमीन सुबेंकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची लोहारा नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी गणेश पवार यानी घोषित केले. यावेळी यांचा नगरपंचायत व मित्र परिवाराच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. निवड होताच फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, गटनेत्या सारिका बंगले, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, पोलिस निरीक्षक अजित चिंतळे, पोलिस उपनिरीक्षक जोकार, राजेंद्र माळी, माजी गटनेते अभिमान खराडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, नगरसेवक गौस मोमिन, नगरसेविका कमल भरारे, नगरसेवक आयुब हबीब शेख, नगरसेवक जालिंदर कोकणे, नगरसेविका आरती कोरे, नगरसेविका मयुरी बिराजदार, नगरसेविका शमाबी शेख, नगरसेविका शामल माळी, नगरसेविका सुमन रोडगे, नगरसेविका आरती गिरी, नगरसेवक विजयकुमार ढगे, नगरसेविका संगिता पाटील, नगरसेवक प्रशांत काळे, नगरसेवक अविनाश माळी, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, पं. स.माजी सदस्य दिपक रोडगे, ओम कोरे, के.डि.पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, यांच्यासह सर्व नगरसेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.