
लोहारा-प्रतिनिधी
व्यकटेश बाबुराव पोतदार यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक
अनेकदा फोन हरविण्याच्या घटना घडत असतात, मग कुठे रस्त्यात, बसमध्ये, अगदी कुठेही. मात्र अनेकदा हे मोबाईल सापडत नाहीत. पण काहीवेळा माणुसकीमुळे अनेकजण मोबाईल परत करतात.आज प्रत्येकाजवळ स्मार्ट फोन आहे, मात्र एकदा हरवला की परत मिळणे कठीण होऊन बसते. तर काहीवेळा अनेक माणसे स्वतःहून मोबाईल परत करत असतात.
तसाच काहीसा प्रकार लोहारा शहरातील महात्मा फुले चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पहायला मिळालं.खेड येथील उपसरपंच अविनाश राठोड यांच्या कार्यक्रमा निमित्त उजनी जवळील ऐकबी (तांडा) येथील विशाल राठोड हे खेड येथे आले होते. कार्यक्रम आटपून परत गावाकडे जातांना त्यांचा अंदाजे १४ हजार रुपये किमतीचा मोबाईल जहागीर किराणा दुकाना समोर पडला.तेथुन चालत जात असलेले न्यु व्हिजन स्कुल येथील शिक्षक तथा वैष्णवी ज्वेलर्स व्यंकटेश बाबुराव पोतदार हे चालत जात असताना मोबाईल सापडला. त्यांनी तो मोबाईल घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला. मिळालेला मोबाईल बाबत विचारणा व शहानिशा करून तो मोबाईल खेड उपसरपंच अविनाश राठोड यांच्या स्वाधीन करण्यात आला.
यावेळी दत्ता पोतदार,गणेश खबोले,गणेश पालके,पवन जगताप,बाबा बादुले,राजु स्वामी आदी उपस्थित होते..
एखाद्या व्यक्तीला स्क्रीनट चा मोबाईल तो ही बिना लॉक चा सापडला तर तो खूप खुश होतो.परंतु व्यंकटेश बाबुराव पोतदार यांनी मोबाईल सापडल्यानंतर,हा मोबाईल कोणाचा हरवला असेल, तो माणूस किती नाराज असेल असा विचार करत संपर्क साधला हे कौतुकास्पद आहे….
लोहारा नगरपंचायत नगरसेविका
तथा
भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष
सौ.आरती सतीश गिरी