तुळजापूर तालुका कृषी विभागाने रंगेहात ८ लाखांचा खतसाठा वाहतूक जप्त; आरोपी अटक गुन्हा दाखल
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर तालुका कृषी विभागाने रंगेहात ८ लाखांचा खतसाठा वाहतूक जप्त; आरोपी अटक गुन्हा दाखल
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांच्या सतर्कतेमुळे खताचा काळाबाजार उघड झाला असुन ३० टन (५९८ बॅग) डीएपी व २०:२०:० जप्त करून तुळजापूर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुजरात येथील एका कंपनीचा परवाना निलंबित असताना देखील त्यांनी खत निर्मिती केले मात्र कृषी विभाग तुळजापूर तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांच्या सतर्कतेमुळे हा काळाबाजार उघड झाला आहे. तुळजापूर तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे व जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांच्या पथकाने रंगेहात ८ लाखांचा खतसाठा वाहतूक होत असताना पकडला असुन आरोपीना अटक केली आहे. ही कारवाई तुळजापूर – लातूर बायपास येथे करण्यात आली, तुळजापूर तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांच्या सतर्कतेमुळे पाठलाग करुन ट्रक पकडण्यात आला त्यानंतर कृषी अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव हे पुढील तपास करीत आहेत.