अल्पनसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांची वार्षिक शिष्यवृत्ती सुरू करावी यासाठी आ.ज्ञानराज चौगुले यांना निवेदन
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
मुस्लीाम समाजासह इतर अल्पनसंख्यांक समाजातील इ. 1 ली ते 10 वी पर्यंतच्या मुलांना केंद्र सरकारने बंद केलेली वार्षिक शिष्यवृत्ती पुन्हा चालु करुन अल्पंसंख्याक कुटूंबातील मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करावे याबाबत उमरगा लोहारा विधानसभा आ.ज्ञानराज चौगुले
यांना लोहारा नगरपंचायत उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख यांनी निवेदन दिले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने अल्पतसंख्यांक समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील शालेय विद्यार्थ्यांना वार्षिक प्रती 1000/- रु प्रमाणे शिष्य्वृत्ती दिली जात होती. परंतू केंद्र सरकारच्या वतीने सदर शिष्यवृत्ती अचानक बंद करण्याखत आली.यामुळे अल्पतसंख्यांक कुटूंबातील प्राथमिक व हायस्कुाल स्तरावर शिक्षण घेणा-या मुलां-मुलींवर अन्याय करणारी आहे.
अल्पंसंख्यांक कुटुंबातील आर्थिक विषमता उत्पन्नाबचे अल्पसाधन नसल्यामुळे मुलांमुलींचे शिक्षण पुर्ण करताना आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रात बहुसंख्य मुस्लीम समाज अल्पषसंख्यांक असुन या कुटूंबाला आर्थिक समस्या. मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. लोहारा तालुका हा मागासलेला असुन भुकंपग्रस्त परिसर आहे.या भागात कुठल्याच सक्षम उत्पन्ना्च्या साधन सामुग्री उपलब्ध नाहीत.अल्पासंख्यांक कुटुंबातील व्यक्तींना दैनंदीन रोजगार उपलब्ध् होत नाही.मुस्लीम समाजासह अल्पसंख्याख समाज मागासलेला असुन या मागासलेपणाची नोंद शासनाच्या रेकॉर्डवर नमूद आहे.आपल्या स्तरावरुन केंद्र सरकारकडे या विषयी तातडीने पाठपुरावा करण्यात यावा व अल्पसंख्यांक कुटुंबातील मुला- मुलींना उर्वरित शिष्यवृत्ती चालु करुन अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना आधार व न्याय द्यावा अशी विनंती उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.यावेळी नगरसेवक आमीन सुंबेकर,गौस मोमीन,आरिफ खानापुरे,आयुब शेख (टेलर),मा पंस सदस्य दिपक रोडगे उपस्थित होते.