ग्रामपंचायतीच्या बोगस कागदपत्रांच्या आधारे एम आय डी सी ची मागणी माहीती अधिकातून उघड
ज्ञानेश्वर गळळी तुळजापूर

ग्रामपंचायतीच्या बोगस कागदपत्रांच्या आधारे एम आय डी सी ची मागणी माहीती अधिकातून उघड
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे नव्याने होणाऱ्या औद्योगिक वसाहत (एम आय डी सी) संदर्भात नविन माहीती समोर आली असुन ४ वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या बोगस कागदपत्रांच्या आधारे नविन औद्योगिक वसाहत (एम आय डी सी) ची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक माहीती माहीती अधिकारात समोर आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम आय डी सी मुंबई यांना शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे गेली अनेक वर्षांपासून औद्योगिक वसाहत (एम आय डी सी) होणार अशी चर्चा होताना दिसत होती. कालांतराने त्या गोष्टीला पुष्टी मिळत गेली आणी तामलवाडी येथे औद्योगिक वसाहत(एम आय डी सी) होणार हे निश्चित झाले त्यासाठी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत उद्यजकांची सोलापूर येथे बैठकही पार पडली त्या बैठकीत ५० ते ६० उद्योजक तामलवाडी येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीत येण्यास तयारही झाले परंतु सदरील बैठकीसाठी किंवा त्या अगोदरही एकाही शेतकर्याला विश्वासात न घेता, बैठकीला न बोलावत फक्त उद्योजकांची बैठक झाली त्यामुळे शेतकरी नाराज झाले.काही दिवसांत जमीनी संपादीत होणार असल्याचे शेतकऱ्यांना कळताच वाहीक बागायती,जिरायती जमीनधारक शेतकर्यांनी औद्योगिक वसाहत कार्यालय लातुर, जिल्हाधिकारी कार्यालयात धाराशिव व मुंबई येथे पत्रव्यवहार करुन उद्योजक व काही शेतकऱ्यांची शेकडो एकर पडीक असलेली जमीन संबंधित अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली.मग पडीक जमीनी सोडून शेतकर्यांच्या वाहीक जमीनी घेण्याचा घाट का घातला जातोय ? शेतकरी वर्गातून उपस्थित केला जातोय. निवेदन देउनही शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास त्यासाठी संबधित शेतकऱ्यांनी उपोषण आंदोलनाचा ईशाराही दिला आहे. औद्योगिक वसाहतीसाठी आमचा विरोध नाही मात्र उद्योजक व काही शेतकऱ्यांची शेकडो एकर पडीक जमीनी सोडून आमच्या जमीनी का घेण्याचा घाट घातला जातोय? असा प्रश्न उपस्थित करुन संबंधित सर्व शेतकर्यांनी दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी एम आय डी सी मुंबई व महाव्यवस्थापक भुसंपादन विभाग मुंबई यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला असुन दि ३० जानेवारी २०२० रोजीच्या मासिक सभेमध्ये औद्योगिक वसाहत स्थापन करण्या संदर्भात शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये कोणताही चर्चा किंवा निर्णय झालेला नाही किंवा तसी प्रोसिंडींगला नोंद नसल्याचे माहीती अधिकारात उघड झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असुन ग्रामपंचायतीच्या बोगस कागदपत्रांच्या आधारे तामलवाडी येथे नविन एम आय डी सी ची मागणी करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चार वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या बोगस कागदपत्रांच्या आधारे तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे नविन औद्योगिक वसाहत (एम आय डी सी) ची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती माहीती अधिकारात उघड झाली आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मग शेकडो एकर पडीक जमीनी सोडुन शेतकऱ्यांच्या बागायती,जिरायती वाहीक जमीनी घेण्याचा घाट का? घातला जातोय, कुणाच्या फायद्यासाठी शेतकर्यांना रस्त्यावर आणले जातेय? असे अनेक प्रश्न नागरीकांमधुन उपस्थित केले जात आहेत