
लोहारा-प्रतिनिधी
खरीप २०२३ मधील धाराशिव जिल्ह्यातील पीक नुकसानी संदर्भात महाराष्ट्रा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या भारतीय कृषी विमा कंपनी विरुद्ध उच्च न्यायालयात १५ जुलै रोजी याचिका दाखल करणार असल्याची माहिती याचिका कर्ते अनिल जगताप यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यासंदर्भात माहिती अशी की सन २०२२ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील ६ लाख ६८ हजार ४३६ अर्ज शेतकऱ्यांनी विमा भरला होता त्यावर्षी अतिवृष्टी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पूर्व सूचनाही दिल्या. मात्र केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढत पिक विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ पन्नास टक्के नुकसान भरपाई दिली. कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी २८ जुलै २०२३ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पिक विमा कंपनीने एक महिन्याच्या आत पंचनामेच्या प्रती जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे द्याव्यात असे आदेश दिले होते. या घटनेला ११ महिने पूर्ण होऊन देखील अद्याप पंचनामेच्या प्रती दिल्या नाहीत. याचा अर्थ पिक विमा कंपनी महाराष्ट्राच्या कृषी मंत्राचा आदेश ही जुमानत नाही का अशी चर्चा आता नागरिकांमध्ये आहे.
दरम्यान राज्य तक्रार निवारण समितीकडे अनिल जगताप यांनी याचिका दाखल केल्यानंतर राज्य तक्रार निवारण समितीने शेतकऱ्यांना २९९४ कोटीचे पीक नुकसान भरपाई द्यावी तसेच पंचनामेच्या प्रती एक महिन्यात उपलब्ध करून द्याव्या व १ लाख ४० हजार पूर्वसूचनाचे फेर सर्वेक्षण करावे असे महत्त्वपूर्ण तीन आदेश दिले होते व त्याचे अंमलबजावणी करण्याची सूचना माननीय जिल्हाधिकारी व माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिली होती.
पिक विमा कंपनीने राज्य तक्रार निवारण समितीच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ २९४ कोटी रुपये वाटप केले मात्र आतापर्यंत पंचनामाच्या प्रती दिल्या नाहीत. पिक विमा कंपनी कृषी मंत्री व राज्य तक्रार निवारण समितीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे.
पंचनामेच्या प्रती का महत्त्वाच्या…
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकरी पद्मराज गडदे व धाराशिव तालुक्यातील शेतकरी अमोल माने या दोन शेतकऱ्यांनी माहिती अधिकारात पंचनामेच्या प्रती एक वर्षभर कष्ट घेऊन कंपनीकडून प्राप्त केल्या. पंचनामेच्या प्रति बघितल्यावर दोघांनाही धक्का बसला कारण गडदे यांना तीन लाख सात हजार हजार एवढी नुकसान भरपाई येणे अपेक्षित असताना त्यांना केवळ ७४ हजार रुपये मिळाले आहेत श्री माने यांच्या पंचनाम्यावरील सह्या त्यांच्या नाहीत पंचनामे नंतर बदलण्यात आले व त्यांना तर केवळ एक हजार रुपये याप्रमाणे रक्कम दिली गेली पंचमीच्या भक्ती हातात पडल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी ७०० कोटी रुपये रक्कम मिळण्याची शक्यता आहे.