
लोहारा-प्रतिनिधी
शंकरराव जावळे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, लोहारा येथे सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला.यावेळी लोहारा नगरपंचायत उपनगरध्यक्ष आयुब शेख यांच्या हस्ते आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जीवनावर प्रकाश टाकला. या अभिवादन प्रसंगी संस्थेचे संचालक जनार्दन पाटील,प्रा.डॉ.विनायक पाटील,डॉ.प्रभाकर गायकवाड,प्रा.डॉ.बालाजी राजोळे प्रा.डॉ.भैरवनाथ मोटे,प्रा डॉ शिवाजी कदम,प्रा डॉ सुदर्शन सोनवणे,प्रा.डॉ.रामहरी सुर्यवंशी,प्रा.दत्ता कोटरंगे,डॉ.रामेश्वर धप्पाधुळे,डॉ.संदीप कोरेकर,डॉ.सुर्यकांत बिराजदार,डॉ.विनोद आचार्य,डॉ.छाया कडेकर डॉ.पार्वती माने डॉ.शिरीष देशमुख,नंदकुमार माने,पाटील प्रविण,राठोड प्रकाश,संजय फुगटे,परमेश्वर कदम आदी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.