तुळजापूर तालुक्यातील गंधोरा ग्रामपंचायत अंतर्गत कोट्यावधीचा भ्रष्टाचार दि.७ जून पासून पंचायत समिती तुळजापूर समोर आमरण उपोषण
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर तालुक्यातील गंधोरा ग्रामपंचायत अंतर्गत कोट्यावधीचा भ्रष्टाचार
दि.७ जून पासून पंचायत समिती तुळजापूर समोर आमरण उपोषण
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील गंधोरा ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या गावातील अनेक विविध विकास कामे सिमेंट रस्ते पाजर तलाव व जलशुद्धीकरण प्रकल्प आरो प्लांट तसेच गंधोरा ते दलित वस्ती स्मशानभूमी सिमेंट रस्ता व हरिभाऊ कुलकर्णी गायरान सिमेंट रस्ता ते नळदुर्ग हायवे रोड गाव सुधारणा १५ व १४ गाव निधी सुधारणा योजनेतील करण्यात आलेली कामे सन २०२१ ते २०२४ आजतागायत करण्यात आलेल्या कामाचा तपशीलवार माहिती ऑडिट व ताळेबंद व कामाचा तपशील जीआर देण्यात यावा,
आलेला निधी कुठल्या कामासाठी वापरण्यात आला सन २०२१ ते २०२४ आजतागयत घरपट्टी व नोंदी घेण्यात आलेले पैसे घरपट्टी जमा करण्यात आलेल्या बँक खात्याच्या डिटेल, ऑडिट, ताळेबंद, आरो पाण्याचे पाच रुपये प्रति प्रमाणे २०२१ ते २०२४ पर्यंतचे जमा शिल्लक रक्कम पूर्ण बँक डिटेल्सह जमा झालेल्या निधीच्या किंवा खर्च झालेल्या रकमेचा हिशोब देण्यात यावा म्हणुन दिनांक ७जून रोजी, पंचायत समिती तुळजापूर च्या समोरील भ्रष्टाचाराच्या बाबतीत व बोगस कामाच्या बाबतीत गट विकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यास निवेदन देवून आमरण उपोषणाला उपोषण कर्ते वैजनाथ शामराव सुरवसे , नितिन कनकदर, उमेश जाधव, बालाजी कंदारे यांनी उपोषणास पाठिंबा देण्यात आला