
लोहारा प्रतिनिधी
रयतेच्या मनातील राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 शिवराज्याभिषेक सोहळा ग्रामपंचायत कार्यालय बेंडकाळ ता. लोहारा येथे 6 जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांनी
परकीय आक्रमण धूर्त आणि दुष्ट शत्रूंचा नायनाट करुन देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे मौल्यवान कार्य राजेंनी केलं होतं.शिवराज्याभिषेक हा गोरगरीब, दीनदुबळ्या जनतेच्या नवआयुष्याचा आणि उत्साहाचा सार सांगणारा सोहळा आसुन. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याने सामाजिक न्याय, बंधुता आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्याचा पाया रचणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सचिव नेताजी दबडे , दिलीप कदम , ओम प्रकाश गोरे, स्वराज्य संघटनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश गोरे, सुरेश जाधव, किशोर माने, प्रवीण गोरे, जयपाल जाधव, ब्रह्मानंद ढोबळे, प्रतीक गोरे, निखिल गोरे, सुनील पवार ,रोहित जाधव, वैभव गोरे, सुशांत देशमुख, प्रथमेश गोरे ,आदीनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.