
लोहारा प्रतिनिधी
लोहारा तालुक्यात टोरंट व सिमेंस गमेशा या पवनचक्की कंपनीने हिप्परगा (रवा) येथे पवनचक्कीचे प्रकल्प 2019 मध्ये उभा केले आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी संपादित केल्या आहेत.जमिनी संपादित करत असताना ज्या ठिकाणी शेतकरी जमीन देण्यासाठी तयार होत नाही अशा ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने जमिनीचा ताबा घेऊन आपले विद्युत पोल रोवले आहेत.तसेच शासनाच्या साठवण तलावासाठी संपादित झालेल्या जमिनीवर व ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह असतो अशा ठिकाणी उच्च दाब असलेले विद्युत लाईन उभा केले आहेत वन्यजीव व शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उभा केलेल्या विद्युत पोल काढून टाकण्यात यावे यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने दि.27/05/2024 पासुन म्हणजे गेल्या तीन दिवसापासून लोहारा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे
जोपर्यंत साठवण तलावातील पोल काढून टाकले जात नाहीत व शेतकऱ्यांच्या शेतातील पोल बाबत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश गोरे यांनी सांगितले. उपोषणाला यावेळी उपोषणास बालाजी मुळे,महेश सुतार,शिवाजी लकडे,राजाभाऊ मुळे,दत्ता मुळे,अंकुश सुतार आदी शेतकरी बसले आहेत.
उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व फकीरा ब्रिगेडचा पाठिंबा
लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथील साठवण तलावातील पोल काढून टाकण्यासाठी चालू असलेल्या स्वराज्य पक्षाच्या आमरण उपोषणास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व फकीरा ब्रिगेड यांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव,पॅंथर नेते दत्ताभाऊ गायकवाड,तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे,युवक सरचिटणीस बालाजी माटे,किशोर भालेराव, देविदास मस्के लक्ष्मण रोडगे तर फकीरा ब्रिगेड मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग सरवदे,लक्ष्मण खंडाळे नागिनी थोरात,सुरेखा गायकवाड आदी उपस्थित होते.