
लोहारा-प्रतिनिधी
जेवळी (उत्तर )येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यांच्या यात्रे निमित्ताने या प्रथम वर्षापासून गाव व गावकरी यांच्या अडीअडचणी ओळखून वेळोवेळी मदत केलेल्या व सामाजिक बांधिलकी जोपासलेल्या मान्यवरांना बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा अभिनव उपक्रम महात्मा बसवेश्वर यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी सुरुवात करून अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. गाव व गावकरी यांच्या मदतीने धावलेले , समाजीक कार्य केलेल्या व सोबतच आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने गावाचे नावलौकिक केलेल्या अश्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना महात्मा बसवेश्वर यात्रा कमिटीने सन्मानित करण्याचा उपक्रम उद्या दिनांक १२ मे रोजी बसवमंच , बाजारपेठ जेवळी येथे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे.सदर पुरस्कारासाठी प्रथम वर्षी ९ रत्नांची निवड करून रूढी ,परंपरा सोबतच आधुनिकतेची वाटचाल सुरुवात केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आपलेपणाची भावना जोपासून सामाजिक एकोपा जोपासण्याची परंपरा अखंडीत ठेवलेली आहे. विशेष म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या विचाराने मानवता हाच धर्म वाटचाल करून सर्व जाती धर्मातील मान्यवरांची निवड करून अभिनव उपक्रम राबविल्या बद्दल गावकऱ्यांनी समाधान व आनौद व्यक्त करण्यात येत असून , यात्रा कमिटीच्या उपक्रमाची स्तुती केली जात आहे.
आदींचा होणार सन्मान
१. बाबुराव माळी – साहित्य
२. बी. एम. बिरादार सर – सामाजिक
३. प्रा. सिद्रामप्पा धरणे – राष्ट्रीय शौक्षणिक
4. विठ्ठल होनाजे – आदर्श पोलिस
5. मोहन धोत्रे – आदर्श शिक्षक
6. उज्वल कारभारी – आरोग्य दूत
7. इंजि. प्रसाद पाटील -आदर्श व्यक्तिमत्व
8. डॉ. कल्याणी भुसणे – शौक्षणिक सहकार्य
9. बालाजी भैराप्पा – युवा शास्त्रज्ञ