न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

प्रचाराच्या तोफा थंडावल्या,३१ उमेदवारांचे भवितव्य होणार आज मतपेटीत बंद

Post-गणेश खबोले

 

लोहारा-प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक २०२४ साठीचा गेले दीड महिना चालू असलेला प्रचार आरोप-प्रत्यारोपाने गाजत वातावरण तापुन ठेवले आहे.५ मे दिवशी सायंकाळी ५ वाजता थंडावला असला तरी प्रत्यक्ष प्रचार संपला असला तरी उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा भर आता छुप्या प्रचारावर दिसुन आला.उस्मानाबाद(धाराशिव) लोकसभेच्या मतदारसंघांसाठी आज(दि.७ मे) या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.या मतदारसंघात यंदा ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक ३१ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा शहरात ६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.त्यात ३ हजार ८३१ पुरुष,३ हजार ६६९ स्त्रिया असे एकुण ७ हजार ५०० मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.
महाविकस आघाडीचे विद्यमान खासदार ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवन राजेनिंबाळकर तसेच महायुती च्या
अर्चना राणाजितसिंह पाटील यांच्यासह विविध पक्षाचे संजयकुमार भागवत वाघमारे,आर्यनराजे किसनराव शिंदे,ज्ञानेश्वर नागनाथराव कोळी,आंधळकर भाऊसाहेब रावसाहेब,गोरे नेताजी नागनाथ,सिद्दिक इब्राहिम बौदीवाले उर्फ ​​गोलभाई,नितेश शिवाजी पवार,शामराव हरिभाऊ पवार,शेख नौशाद इक्बाल,नवनाथ विश्वनाथ दुधाळ,ॲड.विश्वजीत विजयकुमार शिंदे,ॲड.भाऊसाहेब अनिल बेलुरे,अर्जुन (दादा) सलगर,भोरे नितीन खंडू,गोवर्धन सुबराव निंबाळकर,हनुमंत लक्ष्मण बोंदर,काका फुलचंद कांबळे,काकासाहेब संदीपान खोत,मनोहर आनंदराव पाटील,नवनाथ दशरथ उपळेकर,नितीन नागनाथ गायकवाड,राजकुमार साहेबराव पाटील,राम हनुमान शेंडगे,समीरसिंह रमेशचंद्र साळवी,शायनी नवनाथ जाधव,सोमनाथ नानासाहेब कांबळे,उमाजी पांडुरंग गायकवाड,विलास भागवत घाडगे,योगीराज अनंता तांबे आणि नोट्स उमेदवार रिंगणात आहेत.उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे मतविभागणीचा फटका नेमका कोणाला बसणार ? हे निकाला नंतर समजणार आहे.
भाजप विरोधात ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. राष्ट्रवादी-भाजपा-शिवसेना मित्र पक्ष महायुतीच्या अर्चना राणाजितसिंह पाटील आणि शिवसेना(UBT)-राष्ट्रवादी(SP)- काँग्रेस मित्र पक्ष उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्यामध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.उस्मानाबाद(धाराशिव) मतदारसंघात निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभांमुळे प्रचाराचा धुरळा उडाला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,धनंजय मुंडे,तानाजी सावंत,हनिफ मुश्रीफ,उमरगा लोहारा आ ज्ञानराज चौगुले,रवींद्र गायकवाड,बसवराज पाटील यांच्या सह विविध पक्ष नेते,उपनेते,प्रवक्ते प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या.
सुर्य आग ओकत असतांना ही ‘इतके कडक ऊन आम्ही कधी बघितले नव्हते’ असे जुनी-जाणती नागरिक सांगताना लोकसभा निवडणुक महत्त्वाची मानली गेली.त्यामुळे लोहारा येथे सकाळीच प्रचाराला सुरवात होत असल्याचे चित्र दिसले.सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला.दुपारी रस्ते सामसूम,ग्रामीण भागांतही तशीच अवस्था असतांना पदयात्रा,जाहीर सभा उष्णतेची परवा न करता पार पडल्या.आज होणाऱ्या मतदानावरून कोणता उमेदवार दिल्ली वारी ला जाणार हे कळणार आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे