आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांचा अगोदर निषेध; नंतर भेट मराठा समाज किती मतदान करेल ते निकालानंतरच कळनार !
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांचा अगोदर निषेध; नंतर भेट
मराठा समाज किती मतदान करेल ते निकालानंतरच कळनार !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
उस्मानाबाद (धाराशिव ) लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे पती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने मराठा बांधवाकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सोशल मिडीयातून खरपूस समाचार घेताना पाहायला मिळत आहे.धाराशिव लोकसभेचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे पती राणाजगजीतसिंह पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांचा निषेध केला होता.मग जर म्हणाल जरांगे पाटील यांचा निषेध करायचा होता तर आता निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटलांची का कशासाठी भेट घेतली गेली असे मराठा मतदारातून बोलले जात आहे. तुम्ही अगोदर मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका करायची आणि परत भेट घेऊन त्यांच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायचे हे नेमके कशासाठी असा प्रश्न मराठा समाजातून केला जात आहे. राणाजगजीतसिंह पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांचा निषेध केल्याने मराठा समाज नाराज होऊ नये म्हणून यांनी भेट घेतली का किंवा मराठा समाजाने मतदान करावे म्हणून भेट घेतली अशी मराठा समाजातून चर्चा होताना ऐकायला मिळत आहे. जरी राणाजगजीतसिंह पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असली तरी मराठा समाजातील तरुण बांधवाकडून आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे सोशल मीडियावर खरपूस समाचार घेताना दिसून येत आहेत तसेच तुम्ही मनोज जरांगेचे पाटलांची भेट घेतली तरी मराठा समाज तुम्हाला मतदान करणार नसल्याचेही सोशल मिडीयावरून बोलताना दिसून येत आहे. तसेच मनोज जरांगे यांचा राणाजगजीतसिंह पाटील यांनी निषेध केला असल्याने त्यांचे विरोधक याचाच फायदा घेत तर नसतील ना अशीही चर्चा होताना दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मराठा समाज किती मतदान करतो ते निकालानंतरच कळेल हेही तितकेच खरे आहे. तसेच मराठा समाजाचा पूर्ण रोश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही निघत असल्याचे सोशल मीडियावरून दिसून येत आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला याचा फटका बसणार का ? ते ही निकालानंतरच कळणार हे निच्छित आहे