
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे
यात्रेनिमित्त दि.११ रोजी मध्यरात्री दीड वाजता नरसिंह महाराज मंदीराच्या समोर मोकळा जागेत चौथाऱ्यावर ठेवलेल्या शोभेच्या दारुची काळजी न घेता त्याच्या जवळील शोभेची दारु उडवून हयगयीचे कृत्य केले.कार्यक्रम पाहण्यास आलेले लोक या दुर्घटनेत जखमी झाले.
शोभेच्या दारुची काळजी न घेता झालेल्या दुर्घटनेबद्दल
परमेश्वर मेसा प्रताप (वय ४७ वर्षे) रा. हिप्परगा (रवा) यांच्यावर फिर्यादी पोलीस नाईक विजयकुमार बाबासाहेब कोळी यांनी पोलीस ठाणे लोहारा येथे दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे २८५, २८६, ३३७ भा.दं. वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.