
लोहारा / प्रतिनिधी
बलसुर येथील मानाची कावड बलसुर ते शिखर शिंगणापूर कडे पायी रवाना झाली.मानाची कावड लोहारा येथे दि.१२ रोजी आली असता फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत करण्यात आले लोहारा पंचायत समिती मधील कनिष्ठ सहाय्यक मदन पाटील (सोमवंशी) यांनी पुजा आरती करून कावड चे स्वागत केले कावड सोबत आलेल्या २०० ते ३०० पुरुष महिला भक्तांना अल्पोहार व चहापाणी देण्यात आले.तसेच त्या बेंडकाळ येथे बालाजी केशव गोरे यांनी भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले.
मदन पाटील(सोमवंशी) दरवर्षी बलसुर येथील मानाच्या कावड ची स्वागत करून सेवा बजावीत असतात.यावेळी लोहारा येथील शिवानंद माशाळकर,श्रीकांत कदम, प्रभाकर खराडे,विरभद्र फावडे,शिवानंद कोणाळे, प्रा.मनोज सोमवंशी यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.