महायुती उमेदवारांनी स्वाभिमानाने निमंत्रण देऊन बोलावले तरच सहभागी होणार – धर्मराज सावंत
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

महायुती उमेदवारांनी स्वाभिमानाने निमंत्रण देऊन बोलावले तरच सहभागी होणार – धर्मराज सावंत
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
गुढीपाडव्याच्या मुंबईतील मेळाव्यात नरेंद्र मोदी यांच्यासाठी राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा दिला.मात्र महायुतीकडून व त्यांच्या उमेदवाराकडून धाराशिव मतदार संघात कुठलाच प्रतिसाद दिसत नाही. तसेच महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी छापण्यात आलेल्या बॅनर-पोस्टर- पाँम्प्लेटवर राजसाहेब ठाकरे यांचा फोटो व पक्षाचा झेंडा वापरत असल्याचे (छापलेला) दिसून येत नाही.त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराकडून राजसाहेबांचा फोटो व पक्षाच्या झेंड्याचा वापर केल्याशिवाय तसेच त्यांच्या बैठका,मेळावे व सभांना बोलावल्याशिवाय त्या-त्या भागातील कुठलाही कार्यकर्ता,पदाधिकारी व लोकप्रतिनिधी सहभाग नोंदवणार नाही.धाराशिव लोकसभा मतदारसंघात प्रदेश पदाधिकारी, जिल्हाअध्यक्ष,उपाध्यक्ष तालुकाध्यक्ष व शहर अध्यक्ष इतर यांच्या कार्यक्षेत्रात महायुतीकडून बैठका, मिळावे,सभा,कॉर्नर सभा आयोजित केल्या जात आहेत मात्र सदरील ठिकाणी मनसेच्या लोकांना बोलावले जात नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या भागातील कुठलाच सहकारी, (मनसैनिक) निमंत्रणाशिवाय व साहेबांचा फोटो,झेंडा,व स्कार्फचा वापर केल्याशिवाय प्रचार व प्रसार यंत्रणांमध्ये आपला सहभाग नोंदवणार नाही. स्वाभिमान घान ठेवत कोणीही घरंगळत जानार नाही. मात्र राजसाहेबांचा शब्द आणि आदेश प्रमाण मानून आम्ही सर्व महायुतीच्याच उमेदवाराला मतदान करणार आहोत.कुठलाच कार्यकर्ता,पदाधिकारी व लोकप्रतिनिधी राजसाहेब ठाकरे यांचा आदेश डावलू शकत नाही.लवकरच आपले नेते दिलीप बापू धोत्रे व संतोष भाऊ नागरगोजे हे आपली भूमिका संभाजीनगर येथे मांडतील … धर्मराज सावंत मनसे शहराध्यक्ष तुळजापूर यांनी आव्हाण केले आहे.