शालेय व्यवस्थापन समिती खेड अध्यक्षपदी श्रीमती शरवीन शेख,उपाध्यक्षपदी अश्विनी कांबळे
पत्रकार-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेड येथे पालक मेळावा आयोजित करून शालेय व्यवस्थापन समिती निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीत सर्वानुमते अध्यक्ष म्हणून शरविन शेख तर उपाध्यक्ष अश्विनी कांबळे यांची निवड करण्यात आली.तर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य पदी जहिराबी मुल्ला,सलमा मुल्ला,गोकर्णा सगर,रमाकांत कांबळे,किसन पवार,संजय पाटील,सतीश पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शिक्षण तज्ञ म्हणून सज्जत अली शेख यांची निवड करण्यात आली.नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष ब्रह्मानंद पाटील व सरपंच राजश्रीताई कांबळे,दिलीप जाधव,सचिन जाधव,अण्णाराव कांबळे,माणिक जाधव,झैरोददीन मुल्ला,ज्ञानेश्वर काकडे,हरिश्चंद्र गायकवाड,मोहिदीन शेख,विकास सगर उपस्थित होते.
मुख्याध्यापक इंगळे काकासाहेब,महादेव गव्हाळे,सुभाष गायकवाड,शफीक गवंडी,बालाजी साठे,रामदास कांबळे यांनी समिती गठण करण्याचे काम पाहिले.