लाडकी बहीण योजनेच्या समितीवर शिवसेनेचे दत्तोबा (बापूसाहेब )भोसले यांची निवड
लाडकी बहीण योजनेच्या समितीवर शिवसेनेचे दत्तोबा (बापूसाहेब )भोसले यांची निवड

लाडकी बहीण योजनेच्या समितीवर शिवसेनेचे दत्तोबा (बापूसाहेब )भोसले यांची निवड
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राज्यातील महायुतीच्या सरकारने लागू केलेली सर्वसामान्य महिलांसाठी असणारी महत्त्वकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेसाठी सरकारने ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे या योजनेचा सर्वसामान्यांना फायदा व्हावा व सर्वांना त्याचा लाभ मिळावा यासाठी शासकीय कमिटीची स्थापना केली आहे.या कमिटीच्या अध्यक्षपदी तालुक्याचे विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सह आठ सदस्य यांची
पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या शिफारशीने नियुक्ती झाली आहे.
धाराशिव जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी कमिटीची स्थापनेचे पत्र तयार केले आहे. यामध्ये अध्यक्षपदी विद्यमान आमदार व सदस्य पदी शिवसेनेचे बापूसाहेब भोसले
यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे तर तहसिलदार तुळजापूर, यांची ही
सदस्य पदी तसेच गट विकास अधिकरी तुळजापूर यांचोही सदस्यपदी निवड तर
मुख्याधिकारी, नगरपरिषद, तुळजापूर, नळदुर्ग सदस्यपदी निवड तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी तुळजापूर,सदस्यपदी व
महेंद्र भानुदास दुरगुडे जि.प. सदस्य यांचीही सदस्यदी तर शिवसेनेचे दत्तोबा (बापूसाहेब ) रावजी भोसले यांची ही सदस्यपदी आणि उप विभागीय अधिकारी, संजयकुमार ढवळे यांची
सदस्य व सचिव पदी निवड झालेली आहे.या निवडबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.