दुष्काळ मदतीसाठी आधार प्रमाणीकरण अट रद्द करण्यात यावी,लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी
Post-गणेश खबोले

लोहारा(इकबाल मुल्ला)
दुष्काळ मदतीसाठी आधार प्रमाणीकरण अट रद्द करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लोहारा तहसील काशिनाथ पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, शासनाची शेतकर्यांना नैसर्गिक आपत्ती विभागा कडुन दुष्काळी मदतीच्या पैशासाठी आधार प्रमाणीकरण करण्याची अट लावली आहे. ती त्यात महाराष्ट्र शासनाची आपले शासन हे वेबसाईट हि व्यवस्थित चालत नसल्याने शेतकऱ्यांना भरपुर चकरा माराव्या लागतात. त्यात हि कांहीचे नंबर आल्यास वयोवृद्ध पुरुष व महिला शेतकऱ्यांचे आंगठ्याचे बायोमेट्रिक ठसे उमठत नाहित, अशा अडचणीने शेतकरी त्रस्त झाला आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी हि अट रद्द करुण पुर्वी प्रमाणे नैसर्गिक आपत्ती विभागाची दुष्काळी मदत वाटप करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.या निवेदनावर आयनुद्दीन सवार,विरेश स्वामी,उमेश भरारे,अभिमान खराडे,बसवराज पाटील,प्रभाकर रसाळ,किसन सातपुते,मधुकर पवार,गोपाल संदिकर,लक्ष्मण रसाळ,श्रीनिवास माळी,नरदेव काका कदम अदि शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.