
लोहारा-प्रतिनिधी
गुढी पाडवा आणि हिंदु नव वर्षाच्यानिमित्त दि.१० एप्रिल रोजी लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल संस्थापक तथा प्राचार्य शहाजी महावीर जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनावश्यक खर्चाला बगल देत पालावरील चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा केला.
लोहारा शहरातील भारतमाता मंदिर जवळ असलेल्या मसणजोगी व भटक्या जमातीच्या लोकांच्या वस्तीमधील लहान चिमुकल्यानां साखरेचे हार आणि कपडे वाटप करण्यात आले.यावेळी जनकल्यांण समिती चे शंकर जाधव,प्रा.यशवंत चंदनशिवे,दत्तात्रय पोतदार,वीरेश स्वामी,व्यंकटेश पोतदार आदि उपस्थित होते.