
खुदावाडी ( सतीश राठोड ) :-
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडीत समाजसेवक डॉक्टर सिद्रामप्पा खजुरे यांच्या अध्यक्षतेखाली समृद्धी महिला बचत गटाच्या वतीने येथील मुस्लिम बांधवाना रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते . या इफ्तार पार्टीचा मुस्लिम बांधवांनी लाभ घेतला असुन ही प्रथा गेल्या 15 वर्षापासून डॉक्टर खजुरे यांच्या पुढाकारातून केला जातोय.
समाजामध्ये एकात्मतेची भावना वाढावी हिंदू मुस्लिम समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून रोजा इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते . यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने गावात राज्यात व देशात सुख शांती निर्माण होवून देशात रोगराई व साथ रोगापासून मुक्तता व्हावी यासाठी अल्लाह कडे प्रार्थना केली . याप्रसंगी समृद्धी महिला बचत गटाच्या सर्व सदस्या , लिंबराज साखरे , आनंद बिराजदार , नागनाथ शिंदे , सलामत टिनवाले , अखिल शेख , आयदु शेख , नशीब टीनवाले , सद्दाम शेख , मकतूखम शेख , आजान शेख , जिंदावली शेख , सुलतान टिनवाले , आरमान शेख सह ग्रामस्थ मुस्लिम बांधव उपस्थित होते .