तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा परिसरात दारूचा सुकाळ पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पोलिस प्रशासन मात्र चिरीमिरी घेवून सुस्त ?
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा परिसरात दारूचा सुकाळ पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ
पोलिस प्रशासन मात्र चिरीमिरी घेवून सुस्त ?
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा परिसरात पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ तर दारुचा सुकाळ हे कधी थांबनार ? परिसरात पोलिस प्रशासनाच्या अशिर्वादाने मद्यविक्री जोरात चालु आहे. अस्या महाठक लोकांना पोलिस प्रशासन चे बळ खुलेआम पोलिस प्रशासन चिरीमीरी घेऊन दारू विक्री केली जात आहे
वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिसांची पथके फक्त नावालाच कारवाई मात्र शुन्य केली जात आहे. तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा परिसरातील ढाबे, हॉटेल , किरणा दुकान अनाधिकृत दारू खुले आम चालु वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणालाच भनक लागत नाही अशा ठिकाणी बनावट हातभटटीदारू सह देशी विदेशी दारुचा पोलिस शोध घेत नाहीत.
हातभट्टी नावाची विषारी रासायनयुक्त दारू तयार करून प्रत्येक हॉटेल चालकांनी दुकाने थाटली आहेत. आणि परिसरातील अशा परिसरात पहाटेच्या वेळी प्रत्येकाच्या गुत्यावर पोच करतात. ह्या रासायनयुक्त देशी विदेशी दारूमुळे येथील अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.
या परिसरातील अनेकांचे संसार उद्धवस्त झालेले आहेत आणि सध्या पण प्रत्येक हॉटेल ढाबा अशा ठिकाणी मोठया प्रमाणात दारू विक्री चालु आहे. देशी विदेशी दारू खुलेआम विक्री केली जाते त्याबरोबर ग्रामीण भागातील प्रत्येक ढाबा , हॉतेल येथे देशी विदेशी दारू जोरात विक्री चालु आहे. अशा बेकायदा दारू विक्री करणाऱ्यावर आळा कधी बसनार ?
तुळजापूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग हे फक्त नावालाच उरले आहे का ? परिसरातील नागरीकांतून चर्चा होत आहे.