भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती अध्यक्षपदी गणेश कांबळे,उपाध्यक्षपदी अमित सुरवसे
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील सय्यद हिप्परगा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त महेंद्र बुद्ध विहार ठिकाणी DBN ग्रुप लोहारा तालुकाध्यक्ष अमित सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश कांबळे,उपाध्यक्ष पदी अमित सुरवसे,सचिव पदी राजु हिरवे,कोषाध्यक्ष पदी राजेंद्र मोरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी कार्यकारिणीत मिरवणुक प्रमुख पदी सुरेश मोरे व वामन कांबळे,तर सल्लागार पदी पंडु हिरवे व ठकाजी कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
दि-२० रोजी रात्री भिमगितांचा गायनाचा कार्यक्रम आणि दि-२१ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची ढोल ताशा व लेझिम पथकाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
बैठकीला मारुती मोरे,भैरवनाथ कांबळे,शुक्राचार्य हिरवे, तुकाराम मोरे, सदाशिव हिरवे, राहुल दुंडगे,अरविंद सुरवसे,पांडु हिरवे,अंबादास मोरे,गुलाब मोरे,रावजीबा सुरवसे,युवराज सुरवसे,नामदेव हिरवे, गणेश मोरे,विश्वास कांबळे,लखन सुरवसे,समर्थ हिरवे,दर्शन मोरे,उमेश मोरे,राम मोरे,महादु कांबळे, शंकर मोरे,चिंतामणी मोरे,सतीश सुरवसे आदी उपस्थित होते