
मुरूम -प्रतिनिधी
येथील परिसरातील कोथळी येथे महाशिवरात्री निमित्त ग्रामदैवत श्री कल्लेश्वर यात्रा अतिशय भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. दिवंगत बाबुराव कोट्टरगे सावकार यांनी इस २००८ साली काशी जगद्गुरू यांच्या हस्ते कोथळी येथील श्री कल्लेश्वर मंदिरात लिंग स्थापना करून यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. १८ वर्षांपासून यात्रा अगदी भक्तिमय वातारणात संपन्न होत असते. महाशिवरात्री निमित्त श्री कल्लेश्वर देवस्थान येथे दि. २९ फेब्रुवारी ते ०८ मार्च या कालावधीत श्री बसव पुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. दि. ०८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न झाला. याप्रसंगी नंदगाव मठाचे मठादिपती श्री म नि प्र राजशेखर महास्वामी,जवळगा मठाचे श्री म नि प्र विरंतेश्वर महास्वामी,लाडमुगळी मठाचे बसवलिंग महास्वामी,कोथळी मठाचे शरण देवरु आदी मान्यवरांच्या उपस्थितीत यात्रा सोहळा व आशीर्वाद सोहळा अगदी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. प्रारंभी सकाळी संपूर्ण गावातून पालखी व महिला कुंभकळस घेऊन मिरवणूक संपन्न झाला. होमहवन पूजनानंतर आरती त्यानंतर महाराजांचा आशीर्वाद कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महाराजांनी भक्तांना मार्गदर्शन केले. दि.२९ तारखे पासून कर्नाटकातील गदग येथील वेदमूर्ती पंडित राचय्या स्वामी यांच्या मधुर वाणीने व संगीत सिद्धय्या स्वामी आळंद,तबलावादक मल्लिकार्जुन आंबूलगी यांच्या संगीत सहकार्याने दररोज सायंकाळी ०९ ते ११ वेळेत श्री बसव महापूराण सोहळा व ०७ ते ०९ या वेळेत महाप्रसाद कार्यक्रम पार पडला. दि.०८ रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्री कल्लेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी यात्रा समितीच्या वतीने महाराजांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी मंदिरात दीपोत्सव सोहळा व श्री बसव महापुराणाचे सांगता संपन्न झाले. यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यात्रा समिती मल्लिनाथ पाटील, कल्लेश्वर कोट्टरगे,बसवराज पाटील,दत्तात्रय पोतदार,श्रीशैल बिराजदार, चंद्रकांत चौगुले,लक्ष्मण बिराजदार,माणिक आपचे,शिवानंद सक्करगी,बसवंतराव पाटील, आण्णाराव कुलकर्णी, नीलकंठ कोट्टरगे,रवींद्र चौगुले,मनोज चौगुले सह श्री कल्लेश्वर यात्रा भक्त मंडळांनी परिश्रम घेतला. आलेल्या भाविक भक्तांना कोथळी येथील रहिवाशी पुण्यातील उद्योगपती सिद्राम वंजारी यांच्या वतीने हजारो भाविक भक्तांसाठी फराळाची आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त कोथळी परिसरातील, कर्नाटक राज्यातील असंख्य भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.