न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

110 संभाव्य भूमिहीन शेतमजूर आदिवासी पारधी बांधवांना मिळणार कसण्यासाठी शेती 68 हेक्टर जमीन विक्रीस शेतकऱ्यांची सहमती

110 संभाव्य भूमिहीन शेतमजूर आदिवासी पारधी बांधवांना मिळणार कसण्यासाठी शेती
68 हेक्टर जमीन विक्रीस शेतकऱ्यांची सहमती
धाराशिव/न्यूज सिक्सर
धाराशिव तालुक्यातील 110 संभाव्य भूमिहीन शेतमजूर पारधी आदिवासी बांधवांना कसण्यासाठी शेती उपलब्ध होणार आहे.त्यामुळे या आदिवासी भूमिहीन शेतमजूर पारधी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास शेतीची मदत होणार आहे.भूमिहीन असलेला हा पारधी बांधव आता शेतकरी होणार असून त्याच्या नावाचा हक्काचा सातबारा त्यास लवकरच मिळणार आहे.

          या पारधी आदिवासी शेतकरी बांधवांना शेती उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे  सातत्याने प्रयत्नशील होते. उपविभागीय अधिकारी,धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत उपसमितीची बैठक 22 डिसेंबर रोजी संपन्न झाली.या बैठकीत धाराशिव तालुक्यातील पळसप,जागजी, किन्ही,धारुर,वरुडा,मेडसिंगा, बरणगांव,कोंबडवाडी,सांजा,रुई (ढोकी),बेंबळी,घाटंग्री व हिंगळजवाडी या सज्जातील 63 शेतकऱ्यांनी 68 हेक्टर शेतजमीन जी कसण्यास योग्य आहे,ती शासकीय दराप्रमाणे शासनास विक्रीस सहमती दर्शविली.जिल्ह्यातील आदिवासी पारधी भूमिहीन शेतमजूर बांधवांच्या सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी 11 कोटी रुपये इतका वाढीव नियतव्यय उपलब्ध होणार आहे.जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे आदिवासी भूमिहीन शेतमजूर पारधी बांधवांना शेती मिळाली पाहिजे हे सातत्यपूर्ण प्रयत्न कामी आले.आदिवासी पारधी महासंघाचे सुनिल काळे यांनी या कामी पाठपुरावा केला.लवकरच हे पारधी बांधव जमिनीचे मालक बनणार असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारुन सामाजिक जीवनमान उंचावण्यास शेतीची भूमिका महत्वाची राहणार आहे. 28 जुलै 2021 च्या शासन निर्णयानुसार 5 लाख रुपये प्रती एकर जिरायती तर 8 लाख रुपये प्रती एकर बागायती जमीन शासकीय दराने आदिवासी भूमिहीन शेतमजूर पारधी बांधवांसाठी खरेदी करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे