ब्रेकिंगमहाराष्ट्र
महाराष्ट्र विद्यालयाचे NMMS परीक्षेत यश

महाराष्ट्र विद्यालयाचे NMMS परीक्षेत यश
तुळजापूर/न्यूज सिक्सर
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बलता घटक शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या एन एम एम एस परीक्षेत महाराष्ट्र विद्यालय तीर्थ बुद्रुक ता. तुळजापूर या शाळेतील विद्यार्थी प्रथम- सागर शहराज माने
द्वितीय- रेणुका किशोर माडजे
तृतीय- प्राची अनंत माडजे
तृतीय- पृथ्वीराज श्रीकांत शिंदे
यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला .गावातील नागरिकांनी आणि शाळेच्या संस्थेने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील आणि शिक्षक तानाजी म्हेत्रे यांचे सहकार्य लाभले