ब्रेकिंगमहाराष्ट्र
तीर्थ बुद्रुक येथील वैराग्यधाम येथे कार्यक्रमाचे जयत तयारी सभा मंडपाचे पूजन
ज्ञानेश्वर गवळी, पत्रकार तुळजापूर

तीर्थ बुद्रुक येथील वैराग्यधाम येथे कार्यक्रमाचे जयत तयारी सभा मंडपाचे पूजन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर पासून आठ कि मी अंतरावर तीर्थ बुद्रुक येथील वैराग्यधाम येथे लिं, जगद्गुरु श्री सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीवर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रम दिनांक १६ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे कार्यक्रमाच्या अनुषंगाने जयत तयारी करण्यात येत आहे गुरुवारी सभा मंडपाचे पूजन केदारपिठाचे जगद्गुरु श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी संयोजन समितीचे आप्पासाहेब पाटील, गुरुनाथ बडूरे, लक्ष्मण उळेकर, सह महादेव रोचकरी, दत्ता भोसले, गणेश पावले, बालाजी बेटकर, येडगे आदी उपस्थित होते,
फोटो सभा मंडप पूजन प्रसंगी केदार जगद्गुरु आप्पासाहेब पाटील सचिन पाटील गुरुनाथ बडूरे लक्ष्मण ऊळेकर इत्यादी यांनी केले.